ETV Bharat / bharat

पत्रकारावर गुन्हा दाखल केल्याप्रकरणी चिदंबरम यांनी योगी सरकारला खडसावले - चिदंबरम द वायर ट्विट

द वायर या वृत्तसंस्थेचे वरिष्ठ संपादक सिद्धार्थ वरदराजन यांच्यावर उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. वरदराजन यांनी आपल्या ट्विटमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या रामजन्मभूमी उत्सवातील सहभागाबाबत आक्षेप व्यक्त करत, तबलिघी जमात कार्यक्रम आणि रामजन्मोत्सव यामध्ये ते दुजाभाव करत असल्याचे म्हटले होते.

Chidambaram slams UP govt for FIR against journalist
पत्रकारावर गुन्हा दाखल केल्याप्रकरणी चिदंबरम यांनी योगी सरकारला खडसावले!
author img

By

Published : Apr 2, 2020, 3:33 PM IST

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीकात्मक ट्विट केल्यामुळे एका पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या मुद्द्यावरून वरिष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी योगी सरकारला चांगलेच खडसावले आहे.

द वायर या वृत्तसंस्थेचे वरिष्ठ संपादक सिद्धार्थ वरदराजन यांच्यावर उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. वरदराजन यांनी आपल्या ट्विटमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या रामजन्मभूमी उत्सवातील सहभागाबाबत आक्षेप व्यक्त करत, तबलिघी जमात कार्यक्रम आणि रामजन्मोत्सव यामध्ये ते दुजाभाव करत असल्याचे म्हटले होते.

यावर चिदंबरम यांनी प्रतिक्रिया देत म्हटले, की द वायर या वृत्तवाहिनिने केलेली स्टोरी ही केवळ सत्य आणि सत्य बाबींवर आधारित आहे. यामधील एकही गोष्ट चुकीची नाही, तरीही उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांचा गुन्हा काय आहे? हा खरोखरच दुजाभाव आहे, आणि माध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे हा गुन्हा त्वरीत मागे घेतला जावा, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

हेही वाचा : 'दिल्ली मरकझ प्रकरणावरून धार्मिक विभाजनाचा प्रयत्न'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.