नवी दिल्ली - चीन-भारत सैन्यामध्ये संघर्ष झाल्यानंतर भारताचे 20 जवान शहीद झाले. या घटनेनंतर चीनविरोधात देशात संतापाचं वातावरण आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गलवान खोऱ्यात जखमी झालेल्या जवानांची भेट घेतली. मात्र, पंतप्रधान मोदींची ही रुग्णालय भेट सोशल मीडियावर वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या फोटोचे कोलाज टि्वट केले आहे. 'ही चित्रे लाखो शब्दाच्या बरोबर आहेत', असे कँप्शन त्यांनी फोटोला दिले आहे.
-
Pictures worth a million words. pic.twitter.com/ifC4La8Izj
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) July 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Pictures worth a million words. pic.twitter.com/ifC4La8Izj
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) July 4, 2020Pictures worth a million words. pic.twitter.com/ifC4La8Izj
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) July 4, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनमोहन सिंग यांनी भेट दिलेल्या रुग्णालयातील फोटोंची चिंदबरम यांनी तुलना केली आहे. मनमोहन सिंग यांनी भेट घेतलेल्या रुग्णालयात सैनिक जखमी दिसत असून बेडशेजारी ओषधं, ड्रिपची व्यवस्था पाहायला मिळत आहेत. तर मोदींनी भेट घेतलेल्या रुग्णालयात बेड्स दिसत आहेत, परंतु तिथे ड्रिपची व्यवस्था नाही. तसेच बेडशेजारी ओषधं नाही. तर डॉक्टारांच्या जागी फोटोग्राफर आहे. बेडच्या बाजूला साधी पाण्याची बॉटलही नाही. दोघांच्या फोटोचे कोलाज करून करून चिदंबरम यांनी मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे.
दरम्यान अगदी आयत्या क्षणी असलेल्या जागेतच हॉस्पिटल उभारण्यात आल्याची टीका नेटेकऱयांनीही केली आहे. मोदींनी फक्त फोटोंसाठी हा सगळा बनावटीपणा केल्याचे नेटेकऱ्यांनी म्हटलं आहे. दरम्यान सरकार आणि लष्कराने हे आरोप फेटाळले आहेत. देशातील शूर सैन्यावर कशा प्रकारे उपचार केले जातात. यावर शंका घेणे आणि टिका करणे दुर्दैवी आहे. भारतीय लष्कारने आपल्या जवानांना शक्य तितक्या उत्कृष्ट उपचार दिले आहेत, असे एका निवेदनात सैन्य दलाने म्हटले आहे.