रायपूर (छत्तीसगड) - मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या हस्ते ‘दाई-दीदी’ क्लिनिक नावाने महिलांसाठी विशेष मोबाइल क्लिनिक सुरू करण्यात आले. हे मोबाइल क्लिनिक रायपूर, दुर्ग-भिलाई आणि बिलासपूर महानगरपालिकेत महिलांच्या वैद्यकीय गरजा भागवेल.
मुख्यमंत्री बघेल यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिदिनानिमित्त 19 नोव्हेंबरला अर्बन स्लम आरोग्य योजनेंतर्गत या पायलट प्रकल्पाचे उद्घाटन केले. प्रथमोपचार सुविधेसह महिला डॉक्टरांकडून स्तनाचा कर्करोग तपासणी, स्वत:चे स्तन तपासणी, गर्भवती महिलांची नियमित आणि विशेष तपासणीदेखील विनामूल्य मिळू शकेल.
हेही वाचा - तामिळनाडूत 50 फूट खोल विहरीमध्ये पडली हत्तीण; बचावकार्य सुरू
शिवाय ठरलेल्या दिवशी मोबाईल क्लिनिक सेवा अंगणवाड्यांजवळ पुरविली जाईल. महिला आणि बालविकास विभागाच्या सहकार्याने गर्भवती महिला आणि मुलांसाठी असलेले विविध फायदे मोबाइल क्लिनिकद्वारे प्रदान केले जातील.
'महिला त्यांच्या समस्यांबद्दल उघडपणे बोलण्यात संकोच करतात. केवळ स्त्रियाकडूनच प्रशासित व व्यवस्थापित असलेल्या या क्लिनिकमुळे महिलांचे कौटुंबिक नियोजन, कॉपर-टी बसवणे, आपात्कालीन गोळ्यांची उपलब्धता, गर्भनिरोधक गोळ्या, साप्ताहिक गर्भनिरोधक गोळी, गर्भनिरोधक इंजेक्शन याविषयी त्यांचा गोंधळ दूर होईल. याव्यतिरिक्त, कुटुंब नियोजन समुपदेशन, लैंगिक रोगा निवारणाचा सल्ला समुपदेशनदेखील प्रदान केले जाईल,' असे उद्घाटनादरम्यान बोलताना बघेल यांनी म्हटले आहे.
तीन मोबाइल क्लिनिकचे उद्घाटन करताना बघेल यांनी त्यांच्या रक्तदाबाची तपासणी केली. उद्घाटनादरम्यान, नगरविकास मंत्री शिव दाह्रीया, राज्य गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्ष डॉ. कुलदीप जुनेजा, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष किरणमयी नायक; महापौर एजाज ढेबर, अध्यक्ष प्रमोद दुबे, रायपूर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सुभाष धुप्पड, नगरविकास सचिव अलार्मल मंगाई डी, रायपूर जिल्हाधिकारी भारतीदास, रायपूरचे महानगरपालिका आयुक्त यांच्यासह डॉक्टर, परिचारिका उपस्थित होते.
हेही वाचा - रेल्वेवर चढून सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात 15 वर्षीय मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू