ETV Bharat / bharat

अतुल्य भारत: चांद्रयान २ ने अवकाशातून टिपले पृथ्वीचे अप्रतिम छायाचित्र

चांद्रयानाने पृथ्वीचे पहिले छायाचित्र टिपले आहे. हे छायाचित्र एलआय ४ या कॅमेऱयाने ३ ऑगस्टला काढले आहे.

चांद्रयान २
author img

By

Published : Aug 4, 2019, 12:45 PM IST

नवी दिल्ली - भारताचे महत्त्वाकांक्षी चांद्रयान २ मिशन यशस्वीपणे चंद्राकडे मार्गक्रमण करत आहे. चांद्रयानाने पृथ्वीचे पहिले छायाचित्र टिपले आहे. हे छायाचित्र एलआय ४ या कॅमेऱ्याने ३ ऑगस्टला टिपले आहे, अशी माहिती इस्त्रोने ट्विटरद्वारे दिली आहे.

श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून चांद्रयान-2 अवकाशात झेपावले आहे. लॉन्चिंगनंतर ५४ दिवसाने म्हणजेच ५ सप्टेंबरला चांद्रयान-२ चंद्रावर पोहचणार आहे. इस्रोच्या या वाटचालीकडे केवळ भारताचेच नव्हे तर जगाचेही लक्ष लागले आहे.

चांद्रयान-१ च्या यशानंतर अवघ्या दहा वर्षांत 'इस्रो' चांद्रयान-२' च्या निमित्ताने दुसऱ्यांदा चंद्रावर स्वारी करणार आहे. भारताचे चांद्रयान -२ हे संपूर्ण स्वदेशी बनावटीचे यान आहे. भारताला या मोहिमेसाठी एकूण ९७८ कोटी रुपये इतका खर्च आला आहे. याआधी 'नासा'ने १९६९ मध्ये अपोलो हे यान चंद्रावर पाठवले होते. चांद्रयान-१ आणि मंगलयानच्या यशानंतर भारतच्या या मोहिमेकडे जगाचे लक्ष लागले आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.