नवी दिल्ली - भारताची महत्त्वपूर्ण चांद्रमोहीम चांद्रयान - २ अखेरच्या टप्प्यात आहे. चांद्रयान - २ मधून विक्रम लँडर विलग करण्याचा दुसरा टप्पा बुधवारी पहाटे यशस्वी झाल्याचे इस्रोने म्हटले आहे. येत्या शनिवारी ७ सप्टेंबरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) ही माहिती दिली आहे.
चांद्रयान - २ ही इस्रोची दुसरी चांद्र मोहीम आहे. पहिल्या चांद्रयान मोहिमेत पाण्याचे रेणू सापडले होते. या मोहिमेत 'चंद्रावर क्षार, पाणी आहे का? कोणते वायू आहेत का? तेथे जीवनाची शक्यता आहे का? याच्या शक्यता पडताळल्या जाणार आहेत.
-
#ISRO
— ISRO (@isro) September 3, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The second de-orbiting maneuver for #Chandrayaan spacecraft was performed successfully today (September 04, 2019) beginning at 0342 hrs IST.
For details please see https://t.co/GiKDS6CmxE
">#ISRO
— ISRO (@isro) September 3, 2019
The second de-orbiting maneuver for #Chandrayaan spacecraft was performed successfully today (September 04, 2019) beginning at 0342 hrs IST.
For details please see https://t.co/GiKDS6CmxE#ISRO
— ISRO (@isro) September 3, 2019
The second de-orbiting maneuver for #Chandrayaan spacecraft was performed successfully today (September 04, 2019) beginning at 0342 hrs IST.
For details please see https://t.co/GiKDS6CmxE
हे ही वाचा- चांद्रयान - २ : ऑर्बिटरपासून विक्रम लँडर यशस्वीरित्या वेगळा
चांद्रयान २ च्या लँडिंगनंतर रोव्हरचा बाहेरचा कॅमेरा सुरू होईल. त्यानंतर तेथील छायाचित्रे मिळू शकतील. लँडिंगनंतर ५.८ तासांनी प्रत्यक्षात परीक्षणाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा- ८ अपाचे अटॅक चॉपर हवाई दलात दाखल, एअर चीफ मार्शल धानोआ उपस्थित
चंद्रावर 'सॉफ्ट लाँच' करणारा हा भारताचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. यामुळे अशा प्रकारची चांद्रमोहीम आखणारा भारत हा अमेरिका, रशिया, चीन यांच्यानंतरचा चौथा देश ठरणार आहे.