ETV Bharat / bharat

Chandrayaan 2 : ...म्हणून 'ती' 15 मिनिटे आव्हानात्मक, काय घडणार चंद्रावर ? - विक्रम लँडर

चांद्रयान-२ च्या लँडिंगनंतर रोव्हरचा बाहेरचा कॅमेरा सुरू होईल. त्यानंतर तेथील छायाचित्रे मिळू शकतील. परंतु, लँडिंगच्या आधीची १५ मिनीटे अत्यंत महत्त्वाची आहेत असे इस्रोचे चेअरमन के.सिवन यांनी सांगितले आहे. जाणून घ्या या 'मोस्ट टेरीफाइंग मिनीट्स' चे गूढ...

चांद्रयान - २ चा लँडर विक्रम उतरणार चंद्रावर
author img

By

Published : Sep 6, 2019, 7:51 PM IST

Updated : Sep 6, 2019, 8:06 PM IST

३,८४,००० कि.मी. अंतर पार करून चांद्रयान - २ चा चंद्राच्या कक्षेत प्रवास सुरू झाला. यानंतर २ सप्टेंबरला चंद्राच्या कक्षेतच यानाच्या मुख्य ऑर्बिटपासून लँडर वेगळा होऊन तो पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाला. मुख्य ऑर्बिटर चंद्राच्या भूपृष्ठापासून १०० कि.मी. अंतरावर चंद्राभोवती वर्षभर फिरून त्याच्या कमी अभ्यासलेल्या भागावरील माहिती पृथ्वीकडे पाठवणार आहे.

चांद्रयान-२ चा प्रवास ग्राफिक्सच्या माध्यमातून

तसेच ऑर्बिटर पासून वेगळा झालेला विक्रम लँडर वैज्ञानिकांनी निश्चित केलेल्या अवकाशातील ठिकाणाहून चंद्राकडे झेपावणार आहे. या प्रक्रियेत लँडर चंद्राच्या सर्वात जवळील कक्षेतून जवळपास ३५ कि.मी. अंतर पार करून भूपृष्ठावर उतरणार असल्याने हा १५ मिनिटांचा प्रवास आव्हानात्मक असणार आहे.

हेही वाचा India's Lunar Mission: 'चांद्रयान' मोहिमेचा थक्क करणारा प्रवास, 2003 ते 2019

भूपृष्ठाच्या १०० मीटर अंतरावर असतानाच 'हझार्ड अव्हॉइडंस मॅन्युव्हर' ची सुरुवात होणार आहे. यानुसार लँडर चंद्रावर उतरण्यासाठी जागा निश्चित करणार आहे. पृथ्वीवरून चंद्राच्या भूपृष्ठावर असणारे खच खळगे, दगड, उंच-सखल भूभाग स्पष्ट ओळखता येत नसल्याने लँडरला जवळ जाऊन जागा निश्चित करावी लागणार आहे. तसेच लँडर 'विक्रम' वर बसवलेल्या कॅमेऱ्यांमध्ये लँडिंगसाठी जागा सुरक्षित नसल्याचे जाणवल्यास थ्रस्टर्सच्या मदतीने लँडर काही अंतरापर्यंत भूपृष्ठच्या समांतर हालचाली करून त्याचे उतरण्याचे ठिकाण बदलू शकतो.

chandrayaan 2 news
विक्रम लँडर

यावेळी २१,६०० कि.मी. वेगापासून प्रति सेकंद ६ कि.मी. पर्यंत त्याचा वेग नियंत्रणात आणला जाणार आहे. लँडर जसजसे भूपृष्ठाच्या जवळ जाईल, तसतसे हा वेग आणखी कमी होऊन २ मीटर प्रति सेकंद इतका होणार आहे. विक्रम लँडर मधील 'सॉफ्ट लँडिंग'चे तंत्रज्ञान यावेळी महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. यामुळे शास्त्रज्ञांनी निश्चित केलेल्या जागेवरच विक्रम लँड होणार आहे. हे सॉफ्ट लँडिंग यशस्वी झाल्यास भारत पहिल्याच प्रयत्नात या तंत्रज्ञानात यश संपादन करणार आहे. याआधी इस्राईलने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यांना यामध्ये अपयश आल्याने इस्रायलची मोहीम पूर्ण होऊ शकली नाही.

हेही वाचा चांद्रयान-२: आजवर जिथे कोणीच पोहोचले नाही, तिथे आपण उतरणार - के. सिवान

या अंतिम टप्प्यात लँडरचा वेग मंदावण्यासाठी 'थ्रस्टर्स'चा वापर करून विक्रम त्याच्या वेगावर नियंत्रण मिळणार आहे. गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेला बल निर्मितीसाठी याचा वापर केल्याने ते ब्रेक प्रणाली सारखे काम करते. यामुळे लँडरचा भूपृष्ठावर पडण्याचा वेग कमी होऊन सॉफ्ट लँडिंग साधले जाते. या सॉफ्ट लँडिंगमुळे वेग नियंत्रणात येऊन अचूक ठिकाणी उतरता येते.

हेही वाचा 'चांद्रयान-२'च्या लँडिंगसाठी मोदी उत्सुक; क्षणाक्षणाला घेत आहेत माहिती

विक्रमचे यशस्वी सॉफ्ट लँडिंग झाल्यास त्यातील 'प्रज्ञान' रोव्हर चंद्रच्या भूपृष्ठावर उतरणार आहे. भूपृष्ठावर लँड झाल्याच्या तीन तासांनंतर सहा चाकांचा हा रोव्हर बाहेर पडून चंद्राच्या भूभागावरील माती व खनिजांचे नमुने गोळा करून त्यांचे परीक्षण करणार आहे. रोव्हरने गोळा केलेली माहिती लँडर मध्ये एकत्र करून थेट बेंगळुरु मधील कंट्रोल रूम मध्ये पोहोचण्यास मदत होणार आहे. हा रोव्हर सौर ऊर्जेवर चालणार असून, लँडर व रोव्हर हे दोघेही १४ दिवस कार्यरत असणार आहेत.

Intro:Body:

news

Conclusion:
Last Updated : Sep 6, 2019, 8:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.