ETV Bharat / bharat

चंदीगढ लॉकडाऊन आधी आणि नंतर.. प्रशासन बनवतंय डॉक्युमेंट्री - चंडीगढ़ पर डॉक्यूमेंट्री

या डॉक्युमेंट्रीत शहरात लॉकडाऊन आधी काय परिस्थिती होती आणि नंतर काय बदल झाले, हे दाखवण्यात येईल. लॉकडाऊननंतर चंदीगढची हवा देशातील सर्वात स्वच्छ असल्याची नोंद झाली. चंदीगढचा एयर क्वालिटी इंडेक्स 17 नोंदवण्यात आला होता.

चंदीगढ लॉकडाऊन आधी आणि नंतर, प्रशासन बनवतंय डॉक्युमेंट्री

author img

By

Published : Apr 10, 2020, 10:18 AM IST

चंदीगढ - लॉकडाऊनमुळे या सुंदर शहराचे चित्र पूर्णपणे पालटले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे प्रदुषण कमी झाल्याने या शहराची हवा स्वच्छ झाली आहे. तर, अतिशय वर्दळीची असलेली ठिकाणे ओस पडली आहेत. या शहराला अशा स्थितीत आजपर्यंत कोणीच बघितले नसेल. या शहरातील हवा ही देशातील सर्व मुख्य शहरांपेक्षा स्वच्छ झाल्याची माहिती मिळते आहे.

चंदीगढ लॉकडाऊन आधी आणि नंतर, प्रशासन बनवतंय डॉक्युमेंट्री

शहरातील रस्ते आणि सेक्टर - 17 सारख्या बाजारपेठा खाली झाल्या आहेत. शहराचे हेच चित्र टिपण्यासाठई चंदीगढ प्रशासनाकडून एक इनहाऊस डॉक्युमेंट्री बनविली जात आहे. या डॉक्युमेंट्रीत लॉकडाऊन आधीचे आणि नंतरचे शहर दाखवल्या जाईल. याबद्दल माहिती देताना डॉक्युमेंट्रीचे दिग्दर्शक सुरेश मलिक सांगतात,की ही डॉक्युमेंट्री बनविण्याचा मुख्य हेतू लोकांना या शहराच्या पर्यावरणाविषयी जागृत करणे, हा आहे.

ही डॉक्युमेंट्री शहर सुंदर ठेवण्यासाठी लोकांना प्रेरीत करेल - लॉकडाऊन कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आला आहे, हे खरंय. मात्र, चंदीगढमध्ये याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळतो आहे. लॉकडाऊन संपल्यानंतरही हे शहर इतकंच सुंदर आणि स्वच्छ ठेवण्यासाठी लोकांना प्रेरीत करण्यासाठी ही डॉक्युमेंट्री मदत करेल, अशी सुरेश मलिक यांना आशा आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.