ETV Bharat / bharat

'केंद्र सरकार हे विकास समर्थक अन् उद्योग समर्थक'

मानव रचना शैक्षणिक संस्था येथे आत्मनिर्भर भारत वेबलॉगचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमास संबोधित केले. भारतात प्रचंड बाजारपेठ, कुशल मनुष्यबळ, कच्च्या मालाची उपलब्धता आहे. तसेच सरकारही विकास व उद्योग समर्थक आहे, असे ते म्हणाले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
author img

By

Published : Jul 5, 2020, 2:29 PM IST

नवी दिल्ली - मानव रचना शैक्षणिक संस्था येथे आत्मनिर्भर भारत वेबलॉगचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमास संबोधित केले. भारत सरकार विकास समर्थक आणि उद्योग समर्थक आहे. तसेच सरकार देशात अधिकाधिक रोजगाराची क्षमता निर्माण करुन दारिद्र्य निर्मूलन करू इच्छित आहे, असे ते म्हणाले.

भारतात प्रचंड बाजारपेठ, कुशल मनुष्यबळ, कच्च्या मालाची उपलब्धता आहे. तसेच सरकारही विकास व उद्योग समर्थक आहे. चार दिवसांपूर्वी फिलिप कॅपिटलने अमेरिकेत गुंतवणूकदारांसाठी एक कार्यक्रम आयोजित केला. त्या वेबिनारमध्ये सुमारे 10 हजार गुंतवणूकदार माझ्याबरोबर होते. परतावा चांगला मिळत असल्याने त्यांना भारतात गुंतवणूक करायची इच्छा आहे. भारत गुंतवणूकीसाठी हे एक सुरक्षित ठिकाण आहे, असेही ते म्हणाले.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये थेट परकीय गुंतवणूकीलाही प्रोत्साहन दिले जात आहे. आम्ही एमएसएमईसाठी ( लघु, छोटे व मध्यम उद्योग ) अधिक गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करीत आहोत. तसेच एमएसएमईची व्याख्या देखील बदलण्याचा प्रयत्न करीत आहोत. उत्पादन क्षेत्र आणि सेवा क्षेत्राचे स्वतंत्रपणे वर्गीकरण केले गेले होते. परंतु, आता त्यांचे विलीनीकरण करण्यात आले असून त्यास 'उत्पादन व सेवा' असे नाव दिले आहे, असेही त्यांनी सांगितले.

लघू उद्योगासाठी यंत्रसामग्री आणि उपकरणे यांच्या गुंतवणूकीची मर्यादा 25 लाख होती. आता ती 1 कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. लहान उद्योगाची उलाढाल पूर्वी 10 लाख होती, ती आता 5 कोटींवर गेली आहे.

छोट्या उद्योगांच्या बाबतीत ही गुंतवणूक पूर्वी 5 कोटी रुपये होती. ती आता 10 कोटी रुपयांवर आणण्यात आली आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली. त्यामुळे उलाढाल 2 कोटी रुपयांवरून 50 कोटी रुपयांवर गेली आहे, असेही ते म्हणाले.

जेव्हा देशाला कठीण आव्हानांना सामोरे जावे लागले, तेव्हा देशवासीयांनी सकारात्मक उर्जेने त्याचा सामना केला आहे. सध्या अशीच आव्हाने आहेत. कोरोना संक्रमणामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेले वीस लाख कोटींचे पॅकेज अर्थव्यवस्था सुधारण्यासही बरीच मदत करत आहे, असे ते म्हणाले.

भारताला 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनविणे केंद्र सरकारचे लक्ष्य असून त्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहे, असे गडकरी म्हणाले. तसेच देशात अधिक रोजगार निर्माण करायचा असून दारिद्र्य निर्मूलन करायचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.