नवी दिल्ली - केंद्र सरकारने सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री येथून पुढे 18 वर्षाच्या व्यक्तीला करता येणार नसून ती 21 वर्षांवरील व्यक्तीलाच करता येईल, याबाबतचे विधेयक तयार केले आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास 21 वर्षांखालील व्यक्तीने सिगारेट किंवा तंबाखूजन्य पदार्थ खरेदी करणे आणि ते वापरणे अवैध ठरेल.
सरकारने सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ (व्यापार व वाणिज्य, उत्पादन, पुरवठा, वितरण, जाहिरात व नियमन) दुरुस्ती कायदा, 2020 तयार केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सादर केलेल्या नव्या विधेयकाचा एक भाग म्हणजे वयोमर्यादा 21 वर्षे करण्याची तरतूद आहे. या विधेयकात सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ (व्यापार व वाणिज्य प्रतिबंध, उत्पादन व पुरवठा व वितरण) अधिनियम, 2003 मध्ये सुधारणा करण्याचा विचार केला आहे.
विधेयकात प्रस्तावित केलेल्या दुरुस्तींनुसार, कोणात्याही 21 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीला सिगारेट किंवा इतर तंबाखूजन्य वस्तू विकण्याची किंवा विक्री करण्याची परवानगी देण्यात येणार नाही. यासह कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या 100 मीटरच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होणार नाही, अशीही तरतूद आहे.
हेही वाचा - नवीन वर्षाच्या उत्सवाच्या वेळी होंडुरासमध्ये 18 ठार
कलम 7 मध्ये असे सांगण्यात येत आहे की, सिगारेट किंवा इतर कोणतेही तंबाखूजन्य पदार्थ सीलबंद पॅक स्थितीत असावेत. ते मूळ पॅकेजिंगच्या बाहेर विकले जाणार नाहीत.
यामध्ये आणखी एक तरतूद जोडली गेली आहे की, कोणतीही व्यक्ती सिगरेट किंवा इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या प्रत्येक पॅकेजचे किमान उत्पादन घेतल्याखेरीज प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सिगारेट किंवा इतर कोणत्याही तंबाखूजन्य पदार्थांचे उत्पादन, पुरवठा किंवा वितरण करू शकत नाही. पुरवठा किंवा वितरणासाठी किमान प्रमाण निश्चित केलेला नाही.
या कलम 7 चे उल्लंघन केल्यामुळे दोन वर्ष कारावास किंवा एक लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो, तर जास्तीत जास्त शिक्षा पाच वर्ष तुरूंग किंवा पाच लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. तसेच, प्रतिबंधित ठिकाणी धूम्रपान करताना आढळल्यास होणारा दंड 200 रुपयांवरून दोन हजार रुपये करण्यात आला आहे.
हेही वाचा - बैरूत : नवीन वर्षाच्या उत्सवांतील गोळीबारांमुळे तीन विमानांना लागल्या गोळ्या