ETV Bharat / bharat

रामविलास पासवान यांच्या राजकीय कारकिर्दीवर एक नजर

पासवान यांचा राजकीय प्रवास १९६० च्या दशकात बिहार विधानसभेचे सदस्य म्हणून सुरू झाला जो आजपर्यंत चालू होता. १९६९ ला बिहारमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये संयुक्त समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून पासवान निवडून आले.

रामविलास पासवान
रामविलास पासवान
author img

By

Published : Oct 8, 2020, 9:40 PM IST

पटना - 'मैं उस घर में दिया जलाने चला हूं, जहां सदियों से अंधेरा है' या घोष वाक्यातून राम विलास पासवान यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. तळागाळातून वरपर्यंत पोहचलेला एक दलित बिहार नेता अशी त्यांची ओळख निर्माण झाली. बिहार पोलीस दलातील नोकरी सोडून त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता.

खगडिया येथील दलित कुटुंबात जन्मले पासवान

लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष रामविलास पासवान यांचा जन्म 5 जुलै 1946 रोजी खगडियातील दलित कुटुंबात झाला. त्यांनी बुंदेलखंड विद्यापीठ झांसी येथून एम.ए आणि पाटना विद्यापीठातून एलएलबीचे शिक्षण घेतले.

राजकीय प्रवास १९६० च्या दशकात सुरू झाला

पासवान यांचा राजकीय प्रवास १९६० च्या दशकात बिहार विधानसभेचे सदस्य म्हणून सुरू झाला जो आजपर्यंत चालू होता. १९६९ ला बिहारमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये संयुक्त समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून पासवान निवडून आले. १९७७ मध्ये पासवान सहाव्या लोकसभेत जनता पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आले होते. १९८२ च्या लोकसभा निवडणुकीत पासवान दुसऱ्यांदा विजयी झाले.

दलितांच्या कार्यासाठी दलित सेनेची स्थापना

1983 मध्ये रामविलास पासवान यांनी दलितांच्या कार्यासाठी दलित सेनेची स्थापना केली. त्यामुळे त्यांची राजकीय विजयाची घौडदौड पुढे सुरू राहिली. 1989 मध्ये 9 व्या लोकसभेत ते तिसऱ्यांदा निवडून गेले होते. 1996 मध्ये त्यांनी दहावी लोकसभाही जिंकली.

जेडीयूपासून विभक्त झाल्यानंतर 2000 मध्ये लोक जनशक्ती पक्षाची स्थापना

रामविलास पासवान 2000 मध्ये जेडीयूपासून विभक्त झाले आणि त्यांनी सध्याच्या लोक जनशक्ती पक्षाची स्थापन केली. बाराव्या, तेराव्या आणि चौदाव्या लोकसभेतही ते जिंकत गेले. ऑगस्ट २०१० मध्ये राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडले गेले.

1989 पासून दोन मंत्रिमंडळे वगळता सर्ववेळा मंत्री

राजकारण कधीच संपत नाही हे रामविलास पासवान यांना हे चांगले माहीत होते. कदाचित यामुळेच राजकारणाच्या नाडीवर जोरदार पकड असलेले पासवान 1989 पासून दोन मंत्रिमंडळे वगळता सर्व सरकारमध्ये मंत्री होते. कोळसा, दूरसंचार, अन्न पुरवठा आणि रेल्वे अशी अनेक महत्त्वाची मंत्रालये त्यांनी सांभाळली.

रामविलास पासवान यांच्याकडील मंत्रीपदे

  • 1989 मध्ये केंद्रीय कामगार मंत्री होते
  • 1996 मध्ये रेल्वेमंत्री म्हणून पदभार स्वीकारला
  • 1999 मध्ये संचारमंत्री होते
  • 2002 मध्ये कोळसा मंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली
  • 2014 मध्ये अन्न व ग्राहक संरक्षण मंत्री झाले
  • 2014 पासून आतापर्यंत पासवान यांनी अन्न व ग्राहक संरक्षण मंत्री म्हणून काम पाहिले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.