ETV Bharat / bharat

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुन्हा एकदा एम्समध्ये भर्ती - अमित शाह प्रकृती

कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर श्वसनाच्या त्रासामुळे अमित शाह यांना दुसऱ्यांदा एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. या आधी १८ ऑगस्टला त्यांना रुग्णालयात भर्ती करण्यात आले होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
author img

By

Published : Sep 13, 2020, 4:11 AM IST

नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पुन्हा एकदा एम्समध्ये भर्ती करण्यात आले आहे. श्वसनाच्या त्रासामुळे त्यांना शनिवारी रात्री रुग्णालयात भर्ती करण्यात आले. डॉक्टरांच्या विशेष पथकाद्वारे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहिती नुसार त्यांची प्रकृती स्थिर असून 'रुटीन चेकअप' करण्यासाठी त्यांना भर्ती करण्यात आले आहे.

मागील महिन्यात देखील करण्यात आले होते भर्ती -

कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्यानंतरही अमित शाह यांना श्वसनाचा त्रास होत होता. यामुळे त्यांना मागील महिन्यातही एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा तसाच त्रास होत असल्याने त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. रुग्णालय प्रशासनाने याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नसली तरी रुग्णालयाचे एक विशेष पथक गृहमंत्र्यांवर उपचार करत आहे.

कोरोनाचीही झाली होती लागण -

२ ऑगस्टला गृहमंत्र्यांना कोरोची लागण झाली होती. यानंतर त्यांच्यावर गुडगाव येथील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्याने १४ ऑगस्टला त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, १८ ऑगस्टला थकवा आणि शरीर दुखीमुळे त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.