कोलकाता - तृणमूल काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना भाजपमध्ये सामील व्हा नाहीतर तुम्हाला तुरुंगात टाकू, अश्या धमक्या भाजप देत असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला होता. यावर धमकी देणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे सांगा, असे आव्हान दिलीप घोष यांनी ममता यांना केले आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी ह्या कोलकाता येथील जाहीर सभेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी भाजपवर जहरी टीका केली. भाजप कर्नाटक सारखीच परिस्थिती बंगालमध्ये निर्माण करु पाहत आहे. आमच्या आमदारांना एक पेट्रोल पंप आणि दोन करोड रुपयांची लाच देऊन खरेदी करण्याचा भाजप प्रयत्न करत आहे, अशी टीका त्यांनी सभेत केली.
यावर सीबीआय आणि ईडी यांना बदनाम करण्याचे काम ममता बॅनर्जी करत आहेत. कारण त्या चिटफंड घोटाळ्यावर कारवाई करण्याच्या भीतीने घाबरत आहे. जर त्यांच्याकडे धमकी देणाऱ्या अधिकाऱ्याची नावे सांगायला नसतील तर, त्यांनी असे बिनबुडाचे आरोप बंद करावे, असे दिलीप घोष यांनी म्हटले आहे.
भाजप हा गुंडाचा पक्ष असून, निवडणुका लढवण्यासाठी त्यांच्याकडे एवढे पैसे येतात कुठून असा प्रश्न ममता यांनी सभेत उपस्थित केला. याचबरोबर त्यांनी भाजपवर ईव्हिएम मशीनवरून भाजपवर निशाना साधला.