ETV Bharat / bharat

महिला दिन विशेष : जाणून घ्या फुटबॉलची 'दुर्गा' ओयनुम बेंबीम देवी यांच्याविषयी... - महिला दिन विशेष

भारतीय फुटबॉलपटू ओयनुम बेंबीम देवी यांना नुकताच भारत सरकारने 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर केला आहे.

महिला दिन विशेष
महिला दिन विशेष
author img

By

Published : Mar 4, 2020, 12:14 PM IST

नवी दिल्ली - भारतीय फुटबॉलपटू ओयनुम बेंबीम देवी यांना नुकताच भारत सरकारने 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर केला आहे. ओयनुम बेंबीम देवी यांना फुटबॉलची दुर्गा असेही संबोधले जाते.

ओयनुम बेंबीम देवी यांचा जन्म मणिपूरच्या इम्फाळ येथे झाला. ४ एप्रिल १९८० ला जन्मलेल्या बेंबीम देवी यांची भारतीय महिला लीगच्या व्यवस्थापकपदी नियुक्ती करण्यात आली. ओयनुम बेंबीम देवी या फुटबॉलविषयी जागरुकता पसरवत आहेत.

Celebrating Oinum Bembem Devi, the 'Durga' of Indian Football
फुटबॉलची 'दुर्गा' ओयनुम बेंबीम देवी

ओयनुम बेंबीम देवी यांनी १९८८ ला फुलबॉलर म्हणून करिअरची सुरुवात केली होती. १९९१ मध्ये 'सब-ज्युनियर फुटबॉल टूर्नामेंट'मध्ये मणिपूर अंडर-१३ संघाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी त्यांची निवड करण्यात आली होती. तर १९९३ मध्ये मणिपूर राज्य फुटबॉल संघामध्ये त्यांचा समावेश करण्यात आला. हैदराबादमध्ये आयोजित ३२ व्या राष्ट्रीय स्पर्धेनंतर त्यांची राज्य संघाची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली.

ओयनुम बेंबीम देवी यांना फुटबॉलची दुर्गा असेही संबोधले जाते.

वयाच्या १५ व्या वर्षी बेंबीम देवी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर गुआम विरुद्ध आशियाई महिला अजिंक्यपद स्पर्धेत प्रवेश केला. त्या भारतासाठी ६ क्रमांकाची जर्सी घालतात.

भारतीय फुटबॉलपटू ओयनुम बेंबीम देवी यांना नुकताच भारत सरकारने 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर केला

'एआईएफएफ फुटबॉलर ऑफ द ईयर' (२००१), 'एआईएफएफ वुमेन फुटबॉलर ऑफ द ईयर' (२०१३) तर २०२० मध्ये 'पद्मश्री' पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. तसेच त्यांना २०१७ मध्ये 'अर्जुन' पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.