नवी दिल्ली - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने रखडलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द केल्याची माहिती गुरुवारी दिली. सर्वोच्च न्यायालयामध्ये यासंबंधी सुनावणी सुरू असताना याबाबत सांगण्यात आले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दहावी आणि बारावीच्या काही विषयांच्या रखडलेल्या परिक्षा या १ ते १५ जुलैदरम्यान आयोजित करण्याचा विचार सीबीएसई करत होते. मात्र, देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता, या परीक्षा रद्द करण्यात आल्याचे बोर्डाने सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाने या विषयांचे मार्क वर्षभरातील एकूण कामगिरीनुसार विद्यार्थ्यांना देण्यात यावेत, असे निर्देश दिले आहेत.
१८ मे रोजी सीबीएसईने रखडलेल्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले होते. याविरोधात काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या सुनावणीदरम्यान सीबीएसईने न्यायालयात ही माहिती दिली.
हेही वाचा : 'पंतप्रधानांचे विधान विसंगत, लडाखमधील जैसे थे परिस्थिती बदलली'