हाथरस - १९ वर्षीय दलित तरुणीवर झालेल्या अत्याचाराप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागने (सीबीआय) काल ४ तास तिच्या कुटुंबाची चौकशी केली. यावेळी सीबीआय पथकाने कुटुंबाचा जबाब नोंदवला. ही कारवाई जवळपास ५ तास चालली.
मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआय अधिकाऱ्यांनी काल बुलगढी या गावाला भेट दिली. यावेळी पथकाने पीडितेच्या वहिणीला काही प्रश्न केले. १४ सप्टेंबरला घरी कोण-कोण होते, तसेच पीडिता आणि प्रकरणातील एका आरोपीशी संबंधित कथित कॉल तपशिलांबाबतही पथकाने विचारपूस केली.
यावेळी, पथकाने मला जास्त प्रश्न केले नाहीत. त्यांनी मला छोटू बद्दल विचारले. पण, त्याच्या बद्दल मला काही माहिती नाही. असे पीडितेच्या वहिणीने सांगितले. त्याचबरोबर, पथकाने पीडितेचे कपडे नेल्याची माहिती पीडितेच्या वहिणीने दिली.
दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने हाथरस अत्याचार प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केंद्र सरकारला केली होती. त्यानंतर, केंद्राच्या सूचनेनुसार सीबीआयने हे प्रकरण हाती घेतले. त्यानंतर, सीबीआय पथकाने बुलगढी गावातील घटनास्थळाला भेट दिली व तिच्या नातेवाईकांचा जबाब नोंदवला. येथे पथकाने ६ तास घालवले. नंतर पथकाने चारही आरोपींच्या कुटुंबाची चौकशी केली व त्यांचा जबाब नोंदवले.
हेही वाचा- देशात कोरोनाबाधितांची संख्या एकूण ७४ लाखांहून अधिक; 24 तासात ८३७ जणांचा मृत्यू