ETV Bharat / bharat

उन्नाव बलात्कार: आरोपी आमदार सेनगरच्या घरासह इतर १५ ठिकाणी सीबीआयची छापेमारी

author img

By

Published : Aug 4, 2019, 3:07 PM IST

Updated : Aug 4, 2019, 5:35 PM IST

लखनऊ, उन्नाव, बंदा आणि फतेहपूर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी सीबीआय छापे टाकत आहेत.

उन्नाव बलात्का

नवी दिल्ली - उन्नाव बलात्कार प्रकरणी केंद्रीय अन्वेषण पथकाने (सीबीआय) आरोपी भाजपचा आमदार कुलदीप सेनगर याचे घर आणि इतर १५ ठिकाणी छापा मारला आहे. लखनऊ, उन्नाव, बंदा आणि फतेहपूर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई सुरू आहे.

सीबीआयची छापेमारी

आमदार कुलदीप सेनगर याने जून २०१७ रोजी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. तेव्हापासून पिडित तरुणी आणि तिचे कुटुंबीय न्यायासाठी लढत आहेत. मात्र, आमदार सेनगर आणि त्याच्या माणसांकडून पीडितेच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. त्यातच जुलै २८ रोजी रायबरेलीवरुन माघारी येत असताना पीडितेच्या गाडीचा आणि ट्रकचा अपघात झाला. हा अपघाच नसून घातपात असल्याचा संशय आहे. या अपघातात पीडित मुलगी आणि तिचे वकील गंभीर जखमी झाले, तर दोघांचा मृत्यू झाला.

  • Unnao rape case: Central Bureau of Investigation (CBI) is conducting raids at more than 15 places including MLA Kuldeep Singh Sengar's residence in #Unnao. https://t.co/psgorOGfVR

    — ANI UP (@ANINewsUP) August 4, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अपघातानंतर सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश पोलीस आणि सरकारवर ताशेरे ओढले. हे प्रकरण आता सीबीआयकडे वर्ग करण्यात आले आहे. न्यायलयाने अपघाताचा तपास १५ दिवसांच्या आत करण्याचे आदेश सीबीआयला दिले आहेत. तसेच या प्रकरणी तत्काळ सुनावणी घेण्यात येणार आहे. सीबीआयने २ ऑगस्ट रोजी आणि २० अधिकाऱयांचे तपास पथक तयार केले आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Aug 4, 2019, 5:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.