दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र यामुळे अनेकांना मोठ-मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. लॉकडाऊनपूर्वीच बिहारमधून एक वृद्ध वडील आपल्या कॅन्सरग्रस्त मुलाला उपचारासाठी दिल्लीच्या एआयआयएमएस रुग्णालयात घेऊन गेले होते. मात्र, कोरोनामुळे सध्या त्यांच्यावर उपचार केला जात नाही.
देशभरात लॉकडाऊन असल्यामुळे ते आपल्या मुलाला पुन्हा घरी घेऊनही जाऊ शकत नाहीत. अशात या वडिलांना आपल्या आजारी मुलाला घेऊन दारोदार भटकावे लागत आहे. कधी फुटपाथ तर कधी रस्त्यावर राहून ते दिवस काढत आहेत. मात्र, प्रत्येक गरजूला मदतीचे आश्वासन देणारे केजरीवाल सरकार अद्यापही त्यांच्या मदतीसाठी आले नाही.