नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. यावेळी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे उद्देश साध्य करण्यासाठी स्टार (STARS ) कार्यक्रम तयार केला आहे. या कार्यक्रमास मंत्रिमंडळाने बुधवारी मान्यता दिली. STARS म्हणजे Strengthening teaching learning and result for states असल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.
-
#Cabinet approves World Bank supported Strengthening Teaching-Learning and Results for States (STARS) project; total project cost is Rs 5718 crore with the financial support of World Bank amounting to US $ 500 million: Union Minister @PrakashJavdekar #CabinetDecision pic.twitter.com/ULJP92jiEA
— PIB India (@PIB_India) October 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#Cabinet approves World Bank supported Strengthening Teaching-Learning and Results for States (STARS) project; total project cost is Rs 5718 crore with the financial support of World Bank amounting to US $ 500 million: Union Minister @PrakashJavdekar #CabinetDecision pic.twitter.com/ULJP92jiEA
— PIB India (@PIB_India) October 14, 2020#Cabinet approves World Bank supported Strengthening Teaching-Learning and Results for States (STARS) project; total project cost is Rs 5718 crore with the financial support of World Bank amounting to US $ 500 million: Union Minister @PrakashJavdekar #CabinetDecision pic.twitter.com/ULJP92jiEA
— PIB India (@PIB_India) October 14, 2020
STARS हा कार्यक्रम जागतिक बँकेच्या पाठिंब्याने राबवला जात असून शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणार आहे. या संपूर्ण प्रोजेक्टची किंमत 5,718 कोटी रुपये आहे. यामध्ये जागतिक बँकेची 500 मिलियन डॉलर्सची मदत होणार आहे, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.
STARS हा कार्यक्रम हिमाचल प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, केरळा आणि ओडिशा या सहा राज्यांचा समावेश आहे. तसेच याचप्रकारचा कार्यक्रम गुजरात, झारखंड, उत्तराखंड, आसाम आणि तमिलनाडु या राज्यात आशियाई विकास बँकच्या सहयोगाने चालवण्यात येणार आहे.
केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी टि्वट करून स्टार कार्यक्रमास अभूतपूर्व असे म्हटलं आहे. भारतीय शिक्षण क्षेत्रात आजचा दिवस हा ऐतिहासीक दिवस आहे. या कार्यक्रमामुळे नव्या शिक्षण धोरणाचे उद्देश प्राप्त करण्यास मदत होईल. तसेच यामुळे गुणवत्तेवरील आधारीत शिक्षणावर जोर दिला जाईल, असे टि्वट अमित शाह यांनी केले आहे.