ETV Bharat / bharat

'राजस्थानमधून 1 हजार 500 विद्यार्थ्यांना आणण्यासाठी 75 बस पाठवल्या' - छत्तीसगड

केंद्र सरकारच्या संमतीनंतर राजस्थानमधील कोटा येथून सुमारे 1 हजार 500 विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी राज्यातून 75 बसेस पाठविण्यात आल्या आहेत. ही माहिती छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दिली.

Buses sent to Kota to bring back around 1500 students to Chhattisgarh: Bhupesh Baghel

author img

By

Published : Apr 25, 2020, 2:44 PM IST

रायपूर - कोरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे इतर राज्यात छत्तीसगड येथील विद्यार्थी अडकले आहेत. केंद्र सरकारच्या संमतीनंतर राजस्थानमधील कोटा येथून सुमारे 1 हजार 500 विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी राज्यातून 75 बसेस पाठविण्यात आल्या आहेत. ही माहिती छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दिली.

'राजस्थानमधून 1 हजार 500 विद्यार्थ्यांना आणण्यासाठी 75 बस पाठवल्या'

केंद्र सरकारच्या संमतीनंतर राजस्थानच्या कोटा येथून छत्तीसगडमधील मुलांना आणण्यासाठी बस पाठविल्या गेल्या आहेत. याबरोबरच विविध राज्यात अडकलेल्या मजुरांची माहितीही घेतली जात आहे. त्यांनाही राज्यात आणले जाईल, असे बघेल यांनी सांगितले. कोटामध्ये सुमारे 1 हजार 500 मुले अडकून पडली आहेत. इतर राज्यात मजुरांची संख्या एक लाखाहून अधिक आहे, असेही ते पुढे म्हणाले.

प्रत्येक बसमध्ये 25 विद्यार्थी असणार आहेत. प्रवासादरम्यान विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्याठिकाणी असलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात येईल. विद्यार्थी येथे पोहोचल्यानंतर वैद्यकीय तपासणी करून त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली जाईल, असेही सांगितले.

शुक्रवारी राजस्थानमध्ये सुमारे 70 नवीन कोरोनाबाधित आढळले असून राज्यातील एकूण कोरोनबाधित रुग्णांचा आकडा 2 हजार 34 वर पोहचला आहे. जयपूरमध्ये 776, जोधपूर येथे 316, कोटोमध्ये 144, टोंकमध्ये 11, भारतपूर येथे 107 तर अजमेरमधअये 106 कोरोनाबाधित आढळले आहेत. तर देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 24 हजार 506 झाला आहे, यात 18 हजार 668 अॅक्टिव्ह केस आहेत. तर 775 जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर वाढून 20.57 टक्के झाला आहे. मागील 28 दिवसांत 15 जिल्ह्यात एकही नवा कोरोनाचा रुग्ण आढळून आला नाही. तर 80 जिल्ह्यामध्ये मागील 14 दिवसांत एकही नवी केस समोर आली नाही अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.