भोपाळ : मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यात रविवारी रात्री बस पलटून अपघात झाला. या अपघातात १२हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जिल्ह्याच्या कोलारस भागात गुरुद्वाराजवळ ही बस पलटली. यामधील जखमींना कोलारसच्या आरोग्य केंद्रामध्ये भरती करण्यात आले होते. त्यामधील तिघांची परिस्थिती गंभीर असल्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही बस डबराहून अहमदाबादला निघाली होती. कोलारस परिसरात समोरुन येणाऱ्या एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटल्याने ही बस पलटली. यावेळी स्थानिकांनी तातडीने प्रवाशांना बाहेर काढत पोलिसांना याबाबत कळवले. पोलिसांनी सर्व जखमींना आरोग्य केंद्रामध्ये पाठवले. बसमध्ये सुमारे ३० प्रवासी होते, ज्यांपैकी १२हून अधिक लोक जखमी झाले. जखमींमध्ये दुचाकीस्वाराचाही समावेश होता.
हेही वाचा : देवासमध्ये ५६ लाखांचा दारूसाठा नष्ट; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई