ETV Bharat / bharat

लखनऊ-आग्रा एक्सप्रेस वे वर भरधाव बस उलटली; एक ठार, 35 जखमी

author img

By

Published : Oct 30, 2020, 12:42 PM IST

Updated : Oct 30, 2020, 1:16 PM IST

लखनऊ-आग्रा एक्सप्रेस वे वर भरधाव असलेली अनियंत्रित बस उलटली. अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर 35 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. ही बस दिल्लीहून पाटण्याला जात होती.

भरधाव बस पलटली
भरधाव बस पलटली

उन्नाव - लखनऊ-आग्रा एक्सप्रेस वे वर भरधाव असलेली अनियंत्रित बस उलटली. अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर 35 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. ही बस दिल्लीहून पाटण्याला जात होती. पोलिसांनी जखमींना बाहेर काढले असून, रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीहून पाटण्याला जाणारी ही बस भरधाव असल्याने, चालकाचे यावरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला. या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला, तर 35 प्रवासी जखमी झाले.

या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांपैकी 14 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती औरास पोलिसांनी दिली. हा अपघात पहाटे साडेपाचच्या सुमारास झाल्याचेही पोलिसांनी सांगितले. जखमींवर औरास येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Last Updated : Oct 30, 2020, 1:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.