ETV Bharat / bharat

आज..आत्ता.. रात्री १२ वाजेपर्यंत महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर

सरकार स्थापनेसाठी नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींनी आमंत्रण दिले आहे. परदेशात पळून जाणाऱ्या जेट एअरवेजचे माजी अध्यक्ष नरेश गोयल यांनी विमानतळावर पत्नीसह ताब्यात घेतले आहे. दाभोळकर हत्याप्रकरणी सनातनचे वकील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना पोलिसांनी अटक केली आहे. राज्य शासनाचे व्ही शांताराम व राज कपूर पुरस्कार जाहीर झाले आहेत.

आज...आत्ता रात्री १२ वाजेपर्यंत
author img

By

Published : May 25, 2019, 11:52 PM IST

काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार भाजपच्या वाटेवर ?, विखे जो निर्णय घेतील त्यासोबत जाणार
औरंगाबाद - औरंगाबाद जिल्ह्याचे काँग्रेसचे नेते आणि सिल्लोड मतदार संघाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी पक्ष सोडण्याचा विचार केलाय. सत्तार हे राधाकृष्ण विखे पाटलांचे समर्थक समजले जातात. विखे पक्ष सोडण्याच्या मार्गावर आहेत. ते जो निर्ण घेतील तोच निर्णय आपला असल्याचे सत्तार यांनी म्हटले आहे. सविस्तर वाचा....

राष्ट्रपतींची भेट घेत मोदींचा सरकार स्थापनेचा दावा, ३० मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता
नवी दिल्ली - नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली असून सरकार स्थापनेचा दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणीत रोलोआ आघाडीला बहुमत मिळाले आहे. काल (दि. २४) नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाचा राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सोपवला होता. सुत्रांच्या माहितीनुसार येत्या ३० मे रोजी नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचा....

परदेशात पळून जाण्याचा नरेश गोयलांचा प्रयत्न धुळीस, पत्नीसह अधिकाऱ्यांनी घेतले ताब्यात
मुंबई - जेट एअरवेजचे माजी अध्यक्ष नरेश गोयल व त्यांच्या पत्नी अनिता यांना देश सोडण्यापासून तपास अधिकाऱ्यांनी रोखले आहे. हे दोघेही मुंबई विमानतळावरून एमिरेट्सच्या विमानाने मुंबईहून दुबई येथे जाण्याच्या तयारीत होते. नरेश गोयल व त्यांची पत्नी अनिता हे प्रवास करत असलेले विमान उड्डाण करण्याच्या तयारीत होते. यावेळी अधिकाऱ्यांनी विमान उड्डाण थांबविण्याचे आदेश दिले. त्यानंतर विमानतळ अधिकाऱ्यांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. नरेश गोयल यांच्या विरोधात लूक आउट नोटीस निघाल्याने त्यांना देश सोडण्यावर बंदी होती. गोयल दाम्पत्य हे मुंबई विमानतळावरून दुपारी 3 वाजून 35 मिनिटांच्या बोईंग 777 च्या विमानाने दुबईला जाणार होते. सविस्तर वाचा....

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी सनातनचे वकील संजीव पुनाळेकर व विक्रम भावेंना अटक
मुंबई - नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी सीबीआयने आणखीन 2 जणांना अटक केली आहे. सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकर यांच्यासह सनातन संस्थेचे विक्रम भावे या दोघांना अटक केली आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालायत सीबीआयकडून आतापर्यंतच्या तपासाचा अहवाल सादर करण्यात आला होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालय या संदर्भात सीबीआयच्या तपासावर खूश नव्हते. सीबीआय आपला तापस योग्य दिशेने नेत नसल्याचे वेळोवेळी फिर्यादी पक्षाच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. मात्र, यावर तपास करत सीबाआयने आज मुंबईतून सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकर व सनातन संस्थेचा कार्यकर्ता विक्रम भावे या दोघांना अटक करण्यात आली आहे. सविस्तर वाचा...

राज्य शासनाचे चित्रपती व्ही. शांताराम आणि राज कपूर पुरस्कार जाहीर, राज्य मराठी चित्रपट महोत्सवात होणार वितरण
मुंबई -
राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव आणि राज कपूर पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. विनोद तावडे यांनी आज या पुरस्कारांची घोषणा केली. ५६ व्या राज्य मराठी चित्रपट महोत्सवात या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. सविस्तर वाचा...

Intro:Body:

Dummy

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.