डेहराडून - उत्तराखंडमधील डेहराडून येथील नेशविला रोड भागातील इमारत कोसळल्याची घटना रात्री एकच्या सुमारास घडली. यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आतापर्यंत तीन मृतदेहांना आणि दोन जखमींना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश मिळाले असल्याची माहिती एनडीआरएफचे महासंचालक सत्या प्रधान यांनी दिली.
ही इमारत जेव्हा कोसळली तेव्हा आतमध्ये सहा लोक होते. यांपैकी चार जणांचा मृत्यू झाला असून, दोघे जखमी झाले आहेत. जखमींंमध्ये समीर चौहान (३०) या तरुणाचा आणि क्रिश नावाच्या दहा वर्षीय मुलाचा समावेश आहे. यासोबत मृतांमध्ये एका महिलेचा समावेश असून, तिचा शोध सुरू आहे अशी माहिती अधिकाऱ्यानी दिली.