नवीदिल्ली - बहुजन समाजवादी पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी समाजवादी पक्षाबरोबर असणारी युती तोडली आहे. बसप यापुढे पुढील निवडणुका स्वबळावर लढवणार, अशी माहिती मायावतींनी दिली. त्या पत्रकारपरिषदेत बोलत होत्या.
भविष्यात जर आम्हाला युती करण्याची गरज पडली तर आम्ही पुन्हा युती करू शकतो. जर युतीमुळे यश मिळत नसेल आताच वेगळे होणे हे दोन्ही पक्षांसाठी चांगले आहे. बसप उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुका स्वबळावर लढणार, अशी माहिती युती तोडताना मायावतींनी दिली.