चंदीगड - पंजाबमधील भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरून भारतात घुसखोरी करणाऱ्या 5 संशयित लोकांना सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी शनिवारी सकाळी कंठस्नान घातले. ही माहिती सीमा सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
या घटनेची मिळालेली माहिती अशी, की पंजाबमधील तरणतरण जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर शनिवारी सकाळी काही लोकांची संशयास्पद हालचाल सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना दिसली. त्यानंतर जवानांनी त्यांना थांबण्यास सांगितले. यावेळी त्या संशयित लोकांनी जवानांवर गोळीबार केला. त्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी संशयास्पदांपैकी 5 जण ठार झाले. त्यानंतर जवानांनी या भागात शोध मोहीम सुरू केली आहे.