ETV Bharat / bharat

'इटली आणि दक्षिण कोरियात अडकेलेल्या भारतीयांना माघारी आणा' - पिनराई विजयन - कोरोना भारत

इटली आणि दक्षिण कोरिया या देशांमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाल्यामुळे आरोग्य यंत्रणांवर कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे लक्षणे दिसल्याशिवाय तेथील आरोग्य विभाग व्यक्तींची चाचणी करत नाहीत.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Mar 11, 2020, 8:05 AM IST

तिरुअनंतपूरम - नागरी उड्डाण मंत्रालयाने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर इटली आणि दक्षिण कोरियामधील भारतीय नागरिकांना भारतात येण्याआधी कोरोनाची चाचणी अनिवार्य केली आहे. ५ तारखेला लागू केलेले हे परिपत्रक मागे घेण्याची मागणी केरळच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केली आहे. भारतामध्ये आल्यावर त्यांची तपासणी करण्यात यावी, असे पिनराई विजयन यांनी म्हटले आहे.

  • Kerala Chief Minister Pinarayi Vijayan writes to PM Narendra Modi saying, we are receiving information that many Indians are stranded in airports in Italy as they are not able to board flights to India without the certificates of having tested negative for COVID 19. https://t.co/jSVNNGQg2I pic.twitter.com/LVO4hf1keI

    — ANI (@ANI) March 10, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

इटली आणि दक्षिण कोरिया या देशांमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाल्यामुळे आरोग्य यंत्रणांवर कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे लक्षणे दिसल्याशिवाय तेथील आरोग्य विभाग चाचणी करत नाही. मात्र, भारताने कोरोनाची लागण झाली नाही, असा अहवाल असल्याशिवाय भारतात येण्यास परवानगी नाकारली आहे. त्यामुळे अनेक नागरिक विमानतळांवर अडकून पडले आहेत.

कोरोनाबाबत दक्षता घेण्याबद्दल दुमत नाही. मात्र, भारतात आल्यानंतर त्यांची चाचणी घेण्यात यावी, अशी मागणी विजयन यांनी पंतप्रधान मोदींना केली आहे. भारतामध्ये कोरोनाचे रुग्णांचा आकडा ५० पर्यंत पोहचला आहे. त्यामुळे भारत सरकारकडून शक्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. अनेक देशांच्या नागरिकांना व्हिजा नाकण्यात आला आहे.

फ्रान्स, जर्मनी आणि स्पेन या देशातील नागरिकांना आता भारताचा व्हिसा किंवा ई-व्हिसा मिळणार नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे विशेष आरोग्य सचिव संजीव कुमार यांनी माहिती दिली आहे. याआधी सरकारने इटली, इराण, दक्षिण कोरिया, जपान आणि चीनच्या नागरिकांना देण्यात येणारा व्हिसा बंद केला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.