भोपाल - खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केलेल्या बेताल वक्तव्यावर मध्यप्रदेशचे मंत्री बृजेंद्र सिंह राठोड यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला आहे. पंतप्रधान मोदी स्वच्छ भारत अभियानाबाबत बोलतात. मात्र, दुसऱ्या बाजूला त्यांच्याच पक्षातील खासदार अशी विवादित वक्तव्य करुन त्यांच्या अभियानाला कोणतेही महत्व देताना दिसत नाहीत, असे वक्तव्य राठोड यांनी केले.
हा भाजप मधील अंतर्गत वाद असून तो आता रस्त्यावर येत आहे. त्यामुळे अशा प्रकारची वक्तव्य समोर येत आहेत. सर्व खासदारांनी आपल्या भागाच्या विकासासाठी काम केले पाहिजे, असेही ते म्हणाले. भाजप खासदारांच्या बेताल वक्तव्यावर पंतप्रधान मोदी कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाहीत, त्यामुळेच अशी वक्तव्य भाजपमधील नेते वारंवार करत असतात.