रांची - झारखंडमध्ये १३ विधानसभेच्या जागांसाठी मतदान सुरू आहे. मात्र, मतदान सुरू असताना विशुनपूर मतदार संघात गुमाला येथे नक्षलवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला आहे. तर पलामू येथे एका काँग्रेस उमेदवारावर दगडफेक झाली.
हेही वाचा - इंग्रजीच्या शिक्षेकेलाच वाचता येईना इंग्रजी; जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिले निलंबनाचे आदेश
दगडफेकीनंतर काँग्रेस उमेदवाराने स्वसंरक्षणार्थ शस्त्र बाहेर काढले होते. के. एन त्रिपाठी असे काँग्रेस उमेदवाराचे नाव आहे. मतदान केंद्रावर शस्त्र बाहेर काढल्याने काँग्रेस उमेदवाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
निवडणुका सुरू असताना विशुनपूर मतदार संघात गुमाला येथे नक्षवनाद्यांनी बॉम्बस्फोटने पूल उडवून दिला. नागरिकांमध्ये भीती परसवण्यासाठी नक्षलवाद्यांनी हे कृत्य केले. या घटनेमध्ये कोणताही सुरक्षा रक्षक किंवा नागरिक दगावला नाही. मतदान सुरळीत सुरु असून सकाळी ११ वाजेपर्यंत २७ टक्के मतदान झाले.
हेही वाचा - कांदा फक्त 35 रुपये किलो म्हटल्यावर उडाली झुंबड, खरेदीसाठी ग्राहकांच्या लांबच-लांब रांगा
पूल बॉम्बस्फोटाने उडवून दिल्याची माहीती आम्हाला मिळाली आहे. मात्र, त्यामुळे मतदान प्रक्रियेत कोणताही अडथळा निर्माण झाली नाही. ग्रामीण जनता मोठ्या संख्येने मतदान करण्यासाठी घराबाहेर पडत असल्याचे जिल्हा उपायुक्त शशी रंजन यांना सांगितले.