ETV Bharat / bharat

निर्भया प्रकरण: शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवणार..मात्र, 'ही' अट

तिहार तुरुंगातून मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले आहेत. चौघांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन तुरुंग प्रशासन आणि सर्वोच्च न्यायालयाच्या नियमावलीनुसार करण्यात येणार आहे.

निर्भया प्रकरण
निर्भया प्रकरण
author img

By

Published : Mar 20, 2020, 10:04 AM IST

Updated : Mar 20, 2020, 11:35 AM IST

नवी दिल्ली - सात वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर अखेर निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली आहे. तिहार तुरुंगात चारही दोषींनी आज पहाटे ५.३० ला फाशी देण्यात आली. त्यांनतर चौघांचे मृतदेह दिनदयाल उपाध्याय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहेत.

  • 2012 Delhi gangrape case: The families of convicts will have to give an undertaking in writing that they will not make a public demonstration of any kind in relation to the cremation or burial of the bodies.

    — ANI (@ANI) March 20, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

तिहार तुरुंगातून मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले आहेत. चौघांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन तुरुंग प्रशासन आणि सर्वोच्च न्यायालयाच्या नियमावलीनुसार करण्यात येणार आहे. त्यानंतर मृतदेह कुटुंबीयांकडे सोपविण्यात येणार आहेत. मात्र, मृतदेहांवर अंत्यसस्कार करताना कसलेही प्रदर्शन न करण्याचे कुटुंबीयांकडून लेखी लिहून घेण्यात आले आहे. यावेळी रुग्णालयात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना पहाटे ५.३० वाजता फाशी देण्यात आली. त्यामुळे पीडितेसह कुटुंबीयांना सात वर्षांनंतर न्याय मिळाला आहे. फाशी देण्याच्या काही तासांपूर्वी दोषींच्या वकिलांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती. पहाटे अडीच ते सव्वा तीन वाजेपर्यंत सुनावणी घेण्यात आली. यात फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी आरोपींच्या वकिलांनी केली होती. मात्र, ती सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली होती.

  • Delhi: Bodies of 2012 Delhi gangrape case convicts brought to DDU Hospital for postmortem; The postmortem will be done as recommended by the Jail manual and Supreme Court guidelines. After the postmortem, the bodies of the convicts will be handed over to their respective families https://t.co/jOl8mqQQDB pic.twitter.com/lxONR632J7

शेवटी आमच्या मुलीला न्याय मिळाला. आज मी समाधानी आहे. कारण, संपूर्ण देशाला या घटनेनंतर शरमेनं मान खाली घालावी लागली होती. आज संपूर्ण देशाला न्याय मिळाला आहे. अशी प्रतिक्रीया निर्भयाच्या आईने व्यक्त केली आहे.

Last Updated : Mar 20, 2020, 11:35 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.