पटना - बिहार राज्यात महानंदा नदीमध्ये प्रवाशांनी भरलेली बोट बुडाल्याने आत्तापर्यंत ३ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. गुरुवारी पश्चिम बंगालमधील मालदा येथून बिहारमधील कटीहार येथे जात असताना मुकुंदा घाटाजवळ बोट बुडाली. बोटीमध्ये १०० पेक्षा जास्त प्रवासी असल्याचे सांगितले जात आहे. बेपत्ता प्रवाशांचा एनडीआरएफची ७ पथकं शोध घेत आहेत.
-
#UPDATE West Bengal: Three people dead after a boat carrying them from Malda to Bihar's Katihar, capsized in Mahananda river, yesterday. Rescue operation by National Disaster Response Force is underway. pic.twitter.com/7rpOc8oDSQ
— ANI (@ANI) October 4, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#UPDATE West Bengal: Three people dead after a boat carrying them from Malda to Bihar's Katihar, capsized in Mahananda river, yesterday. Rescue operation by National Disaster Response Force is underway. pic.twitter.com/7rpOc8oDSQ
— ANI (@ANI) October 4, 2019#UPDATE West Bengal: Three people dead after a boat carrying them from Malda to Bihar's Katihar, capsized in Mahananda river, yesterday. Rescue operation by National Disaster Response Force is underway. pic.twitter.com/7rpOc8oDSQ
— ANI (@ANI) October 4, 2019
ही धक्कादायक घटना बिहारमधल्या आबादपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डमडोलीया-बाजीतपूर गावांदरम्यान घडली. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्यामुळे बोट बुडाल्याचं सांगितलं जात आहे. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे बोट अनियंत्रीत होवून बुडाली.
बोट बुडाल्याची माहिती मिळताच बारसोई आणि मालदा येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच स्थानिक लोकप्रतिनीधीही मदतीसाठी दाखल झाले. मृतांमध्ये बिहारमधील कटीहार जिल्ह्यातील एकाचा आणि बंगालमधील मालदा जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे. आपत्ती निवारण दलाची ७ पथकं मदाकर्यात व्यस्त आहेत.
अपघातग्रस्त बोट पश्चिम बंगाल सरकारद्वारे चालवली जात होती. जे व्यक्ती बेपत्ता आहेत, त्याती माहिती बंगाल सरकारला दिली जाईल, असे स्थानिक प्रशासनाने सांगितले आहे.