ETV Bharat / bharat

व्हर्च्युअल रॅलीतून विरोधकांचे खच्चीकरण करण्याचा भाजपाचा डाव; अखिलेश यादवांची टीका

समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपाच्या व्हर्च्युअल रॅलीवर ट्विटच्या माध्यमातून टीका केली आहे. झारखंडप्रमाणे बिहारमध्ये पराभव होणार असल्याचे भाजपाला समजले आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

akhilesh yadav
अखिलेश यादव
author img

By

Published : Jun 8, 2020, 5:15 PM IST

लखनऊ - बिहारमध्ये घेतलेल्या व्हर्च्युअल रॅलींमधून आर्थिक ताकद दाखवण्याचा प्रयत्न भाजपाचा आहे. याद्वारे ते विरोधी पक्षांचे मनोबल खच्ची करण्याच्या प्रयत्नात आहेत, अशी टीका उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली आहे.

झारखंडनंतर बिहारमध्ये भाजपाचा पराभव होणार आहे. बिहारमधील लोक विरोधात गेले आहेत, हे समजल्यामुळे भाजपा 150 कोटी रुपये खर्च करून व्हर्च्युअल रॅली घेत आहे, असे अखिलेश यादव यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. बिहार राज्यातील भाजपाची जदयूशी असलेली तथाकथित युती गटबाजी आणि अविश्वासाने ग्रासलेली आहे, असेही यादव म्हणाले.

व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी भाजपा कार्यकर्ते आणि बिहारच्या जनतेशी संवाद साधला होता. एनडीएमुळे बिहारचा प्रवास जंगल राज ते जनता राज असा झाला. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वात एनडीए दोन तृतीयांश बहुमताने बिहारची निवडणूक जिंकेल, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.