श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्याच्या हल्ल्यात रविवारी गंभीर जखमी झालेल्या भाजप कार्यकर्त्याचा एसएमएचएस रुग्णालयात सोमवारी मृत्यू झाला. हा हल्ला मध्य काश्मीर मधील बडगाम जिल्ह्यातील ओमपोरा भागात झाला होता.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्याचे कार्यकर्त्याचे नाव अब्दुल हमीद नजार असे आहे. या भाजप कार्यकर्त्याला संशयित दहशतवाद्याने त्यांच्यावर गोळीबार केला होता. हा कार्यकर्ता बडगाम जिल्हा भाजपच्या ओबीसी सेलचा अध्यक्ष होता.