ETV Bharat / bharat

सुशांतच्या कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत भाजप शांत बसणार नाही - शाहनवाज हुसेन

सुशांतसिंहने कोणाच्याही पाठिंब्याशिवाय बॉलिवूडमध्ये कमी वेळात नाव कमवले. तो आत्महत्या करूच शकत नाही, त्याची हत्या करण्यात आली आहे, असे हुसेन म्हणाले. सुशांतच्या आत्महत्येचे प्रकरण देशभरात गाजत आहे. आम्हाला महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांवर विश्वास नसल्याने आम्ही सीबीआय चौकशीची मागणी करत आहोत, असे हुसेन यांनी सांगितले.

bjp-will-never-remain-silent-until-sushants-family-get-justice-shahnawaz-hussain
शाहनवाज हुसेन, भाजप प्रवक्ते
author img

By

Published : Aug 15, 2020, 7:45 AM IST

नवी दिल्ली - सुशांतच्या कुटुंबीयांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत भारतीय जनता पक्ष शांत बसणार नाही, असे वक्तव्य भाजप प्रवक्ते सय्यद शाहनवाज हुसेन यांनी केले आहे. ईटीव्ही भारतशी बोलताना हुसेन यांनी सुशांतसिंह प्रकरणी महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांवर निशाणा साधला.

सुशांतसिंहने कोणाच्याही पाठिंब्याशिवाय बॉलिवूडमध्ये कमी वेळात नाव कमवले. तो आत्महत्या करूच शकत नाही, त्याची हत्या करण्यात आली आहे, असे हुसेन म्हणाले. सुशांतच्या आत्महत्येचे प्रकरण देशभरात गाजत आहे. आम्हाला महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांवर विश्वास नसल्याने आम्ही सीबीआय चौकशीची मागणी करत आहोत, असे हुसेन यांनी सांगितले.

सुशांतसिंहचे ७४ वर्षीय वडील आपल्या मुलासाठी न्याय मागत असताना महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलीस सुशांतसिंहच्या कुटुंबीयांशी नीट वागत नाही, असा आरोप त्यांनी केला. मुंबई पोलीस गेल्या दोन महिन्यांपासून प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, अद्याप त्यांनी एफआयआर दाखल केला नाही, तर कोणालाही अटक केली नाही. तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांची या प्रकरणातील वक्तव्ये लाजीरवाणी असल्याची टीका शाहनवाज हुसेन यांनी केली. महाराष्ट्र सरकार याप्रकरणी कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही हुसेन यांनी केला.

शाहनवाज हुसेन, भाजप प्रवक्ते

सुशांतसिंहने १४ जुनला राहत्या घरी आत्महत्या केली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, सुशांतसिंहची हत्या झाल्याची विधाने समोर आल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी ४० जणांचे जबाब नोंदवले आहेत. यामध्ये सुशांतसिंहची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, सुशांतचे कुटुंबीय, चित्रपट निर्माते संजय लीला भंसाली, शेखर कपुर, आदित्य चोप्रा आणि इतर काही जणांचा समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.