ETV Bharat / bharat

भाजपचा हैदराबादमध्ये हिंसा भडकवण्याचा डाव - के.टी. रामाराव - Hyderabad man self immolate

दुब्बक विधानसभा मतदारसंघात उद्या पोटनिवडणूक पार पडणार आहे. मात्र त्याच्या एक दिवस आधीच तेलंगणाचे उद्योगमंत्री के.टी. रामाराव यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. पोटनिवडणुकीदरम्यान भाजपचा हिंसा भडकवण्याचा डाव असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

KTR said BJP trying to incite violence
के.टी. रामाराव
author img

By

Published : Nov 1, 2020, 10:56 PM IST

हैदराबाद - दुब्बक विधानसभा मतदारसंघात उद्या पोटनिवडणूक पार पडणार आहे. मात्र त्याच्या एक दिवस आधीच तेलंगणाचे उद्योगमंत्री के.टी. रामाराव यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. पोटनिवडणुकीदरम्यान भाजपचा हिंसा भडकवण्याचा डाव असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. के. टी रामाराव हे टीआरएसचे कार्यअध्यक्ष देखील आहेत. आपल्याला मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार भाजप पोटनिवडणुकीत हिंसा भडकवणार आहे. असा आरोप त्यांनी यावेळी केला.

दरम्यान याबाबत त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना एक पत्र लिहीले आहे. त्यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, निवडणुकीदरम्यान हिंसा भडकून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येणार आहे. याबाबत आपल्या खात्रीशीर माहिती मिळाल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. दरम्यान त्यांनी या पत्राची एक प्रत राज्य निवडणूक आयुक्त आणि पोलीस महासंचालकांना देखील पाठवली आहे.

रविवारी एका व्यक्तीने भाजप कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. या घटनेचा उल्लेख देखील त्यांनी आपल्या या पत्रामध्ये केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, भाजपकडून मोठा कट रचला जात आहे. भाजपला निवडणुकीदरम्यान हिंसा घडवून आणायची आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा त्यांचा डाव आहे. पोलिसांनी वेळीच यामध्ये लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी. त्यामुळे पुढील अनर्थ टळू शकतो.भाजपने आपल्याला अनेकवेळा खोटारडे ठरवण्याचा प्रयत्न केला. आपली बदनामी करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते त्यात अपयशी ठरल्याने आता हिंसा भडकून ते सरकारला बदनाम करू इच्छित आहेत. मात्र आपण कोणताही गैरप्रकार होऊ देण्यार नाही असे त्यांनी म्हटले आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.