नवी दिल्ली - भारत आणि चीनमध्ये झालेल्या झटापटीमध्ये भारताच्या 20 जवानांना वीरमरण आले. या घटनेनंतर संपूर्ण देशामध्ये चीनविरोधात संताप व्यक् करण्यात आला. परिणामी ‘चीनी वस्तूंवर बहिष्कार घाला’ अशी मोहिमही सुरू झाली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज (मंगळवारी) आपल्या ट्वीटर खात्यावरून मोदी सरकार आणि मनमोहन सिंग सरकार यांच्यामधील फरक स्पष्ट केला आहे. त्यांनी मोदी सरकारच्या मेक इन इंडिया योजनेवर टीका केली.
-
Facts don’t lie.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
BJP says:
Make in India.
BJP does:
Buy from China. pic.twitter.com/hSiDIOP3aU
">Facts don’t lie.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 30, 2020
BJP says:
Make in India.
BJP does:
Buy from China. pic.twitter.com/hSiDIOP3aUFacts don’t lie.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 30, 2020
BJP says:
Make in India.
BJP does:
Buy from China. pic.twitter.com/hSiDIOP3aU
गांधी म्हणाले, मोदी सरकारने भारतामध्ये ‘मेक इन इंडिया' ही योजना राबवली. मात्र, प्रत्यक्षात चीनकडून सर्वात जास्त वस्तू आयात केल्या आहेत. त्यांनी एका आलेखाचा संदर्भ देत एनडीए आणि युपीए सरकारच्या काळातील चीनी वस्तू आयातीचा फरक स्पष्ट केला आहे. 2014 नंतर मोदी सरकार सत्तेत आले आणि त्यांनी चीनकडून जास्तीत जास्त वस्तू आयात करण्याचा सपाटाच लावला, असेही गांधी म्हणाले.
आलेखामध्ये काय म्हटले ?
2008 ते 2014 या कालावधीमध्ये युपीए सरकारने 14 टक्के वस्तू चीनकडून आयात केल्या आहेत, तर एनडीए सरकारच्या काळात हेच प्रमाण 18 टक्के झाले. 2008 ला मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये चीन वस्तू आयात करण्याचे प्रमाण 12 टक्के होते. 2012 ला ते 14 टक्के झाले. पुन्हा 2014 मध्ये ते 12 टक्के झाले.
पंतप्रधान नरंद्र मोदी यांच्या कार्यकाळात 2015 ला चीनकडून 14 टक्के वस्तू आयात केल्या. तेच प्रमाण 2016 मध्ये 16 टक्के झाले, तर 2018 मध्ये 18 टक्के झाले होते.