नवी दिल्ली - महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज (२ ऑक्टोबर) भारतीय जनता पक्ष देशभरात कार्यक्रम घेत आहे. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी आज दिल्लीमध्ये 'गांधी संकल्प यात्रे'ला सुरवात केली. 'गांधींची १५० वी जयंती आपल्या सर्वासाठी संकल्पाची बनावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला प्लास्टिकपासून मुक्त करण्याचा संकल्प केला आहे. प्लास्टिकचा वापर न करून मोदींचा संकल्प पूर्ण करण्याची जबाबादारी आपल्या सर्वांची आहे', असे अमित शाह जनतेला संबोधित करताना म्हणाले.
महात्मा गांधींनी सत्य आणि अहिंसाचा मार्ग जगाला दाखवला. भारतीय संस्कृतीची ओळख जगाला करून दिली. सत्याग्रहाच्या माध्यमातून त्यांनी इंग्रजांना झुकायला भाग पाडले. अशा या महामानवाची जयंती संपुर्ण देश साजरी करत आहे, असे शाह म्हणाले.
-
BJP President Amit Shah during 'Gandhi Sankalp Yatra' in Delhi: Gandhi ji's satyagraha movement brought the British to their knees. He showed the path of truth and non violence to the world. #GandhiJayanti pic.twitter.com/fX63hEvNIy
— ANI (@ANI) October 2, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">BJP President Amit Shah during 'Gandhi Sankalp Yatra' in Delhi: Gandhi ji's satyagraha movement brought the British to their knees. He showed the path of truth and non violence to the world. #GandhiJayanti pic.twitter.com/fX63hEvNIy
— ANI (@ANI) October 2, 2019BJP President Amit Shah during 'Gandhi Sankalp Yatra' in Delhi: Gandhi ji's satyagraha movement brought the British to their knees. He showed the path of truth and non violence to the world. #GandhiJayanti pic.twitter.com/fX63hEvNIy
— ANI (@ANI) October 2, 2019
भाजपचे कार्यकर्ते आजपासून ३१ ऑक्टोबरपर्यंत १५० किलोमीटर पदयात्रा करणार आहेत. कार्यकर्ते या पदयात्रेच्या माध्यमातून गांधीचे विचार लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम करणार असल्याची माहिती शाह यांनी दिली.