ETV Bharat / bharat

पश्चिम बंगालमधील भाजप आमदार देबेंद्र राय यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला

भारतीय जनता पक्षाचे आमदार देबेंद्र नाथ रॉय यांचा मृतदेह त्यांच्या निवासस्थानाजवळ लटकलेला आढळला. हेमताबाद येथील त्यांच्या घराच्या घराजवळील बिंदल भागातील दुकानात लटकलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळला आहे.

bjp mla devendranath roy's body found hanging
देबेंद्र राय मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला
author img

By

Published : Jul 13, 2020, 10:08 AM IST

Updated : Jul 13, 2020, 2:01 PM IST

हावडा (पश्चिम बंगाल) - भारतीय जनता पक्षाचे आमदार देबेंद्र नाथ रॉय यांचा मृतदेह त्यांच्या निवासस्थानाजवळ लटकलेले आढळले. हेमताबाद येथील त्यांच्या घराच्या घराजवळील बिंदल भागातील दुकानात लटकलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळला आहे. आधी त्यांची हत्या करण्यात आली आणि मग त्यांचा मृतदेह लटकवला गेला, असा दावा पश्चिम बंगाल भाजपने केला आहे.

रविवारी रात्री काही जणांनी त्यांना घरबाहेर बोलावले होते. त्यानंतर मात्र, ते घरी परतले नाही. देबेंद्र उत्तर दिनाजमधील राखीव जागेवरुन भाजपचे आमदार होते. त्यांचा मृतदेह बिंदाल येथे त्याच्या गावात लटकलेलेल्या अवस्थेत आढळला.

यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ट्विट केले. ते म्हणाले, 'या घटनेने धक्का बसला आहे. या घटनेमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अपयशी झाली आहे. आम्ही या घटनेचा निषेध करतो.'

दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यासंदर्भात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Last Updated : Jul 13, 2020, 2:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.