ETV Bharat / bharat

'भाभीजी पापड' खाल्ल्याने होत नाही कोरोना; राजस्थानच्या मंत्र्यांचा अजब दावा..

author img

By

Published : Jul 24, 2020, 6:09 PM IST

केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी दावा केला आहे, की 'भाभीजी पापड' खाल्ल्यामुळे शरीरात कोरोनाच्या अ‌ँटीबॉडिज तयार होण्यास मदत होते. मेघवाल यांनी असा दावा करतानाचा व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला होता. मात्र, काही तासांनी लोकांनी केलेल्या ट्रोलिंगनंतर त्यांनी तो डिलीट केला.

BJP minister launches immunity booster papad to fight COVID-19
'भाभीजी पापड' खाल्ल्याने होत नाही कोरोना; राजस्थानच्या मंत्र्यांचा अजब दावा..

जयपूर : राजस्थानच्या एका भाजप मंत्र्याने कोरोनाला रोखण्यासाठी नवीन औषध शोधून काढले आहे. हे औषध गोमूत्रापासून किंवा कोणत्याही औषधी वनस्पतीपासून बनलेले नाही, तर हे चक्क डाळीपासून बनलेले आहे. हे औषध दुसरे-तिसरे काही नसून 'पापड' आहे!

केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी दावा केला आहे, की 'भाभीजी पापड' खाल्ल्यामुळे शरीरात कोरोनाच्या अ‌ँटीबॉडिज तयार होण्यास मदत होते. मेघवाल यांनी असा दावा करतानाचा व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला होता. मात्र, काही तासांनी लोकांनी केलेल्या ट्रोलिंगनंतर त्यांनी तो डिलीट केला.

'भाभीजी पापड' खाल्ल्याने होत नाही कोरोना; राजस्थानच्या मंत्र्यांचा अजब दावा..

यापूर्वी योगगुरू रामदेव बाबांनीही कोरोनावरील औषध तयार केल्याचा दावा केला होता. मात्र आयुषने यासंबंधी अहवाल मागितल्यानंतर त्यांनी आपला दावा मागे घेत, आपण तर केवळ रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे औषध तयार केले असल्याचा पवित्रा घेतला.

तर हिंदू महासभेचे अध्यक्ष चक्रपाणी महाराजांनी कोरोनावरील उपचारांसाठी गोमूत्र आणि गाईच्या शेणाचा वापर करण्याचा सल्ला दिला होता. तसेच, कोरोनाचा खात्मा करण्यासाठी त्यांनी एक यज्ञही आयोजित केला होता.

आणखी एका केंद्रीय मंत्र्याने यापूर्वी असा दावा केला होता, की ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांच्यावर बंगळुरूमधील एका आश्रमामध्ये आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी उपचार घेऊनच ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स हे कोरोनामुक्त झाले होते.

हेही वाचा : उत्तर प्रदेशच्या आरोग्य मंत्र्यांना कोरोनाची लागण..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.