ETV Bharat / bharat

ममतांनी कोणती साडी नेसावी याचा सल्ला आता प्रशांत किशोर देणार का? भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य - मुकल रॉय

प्रशांत किशोर याआधी अखिलेश यादवांनाही भेटले आहेत. त्यांनी अखिलेश यांना उत्तर प्रेदेशातून संपवून टाकले आहेच. आता ते ममतांनाही बंगालमधून संपवण्याची तयारी करत आहेत असेही मुकल रॉय यांनी म्हटले आहे.

मुकल रॉय
author img

By

Published : Jun 9, 2019, 1:36 PM IST

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये आगामी २०२१ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी प्रसिद्ध राजनीतीज्ञ प्रशांत किशोर यांची मदत घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतला आहे. त्यावर भाजप नेते मुकुल रॉय यांनी वादग्रस्त विधान केले आहे. प्रशांत किशोर आता ममतांना कोणती साडी नेसावी, हे सांगणार का? असा सवाल त्यांनी केला आहे.

मुकुल रॉय यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. बंगालमध्ये ममतांची जादू ओसरली आसून त्यासाठीच त्यांनी प्रशांत किशोर यांना पाचारण केले आहे. ममतांनी साडी कशी नेसावी, वेणी कशी घालावी आणि हात कसा हालवावा, हे आता प्रशांत किशोर ठरवतील, असे ते यावेळी म्हणाले.

यावेळी प्रशांत किशोर हे भाजपचा सहयोगी असलेल्या जदयूचेही उपाध्यक्ष आहेत, त्याबद्दल काय सांगाल? असा प्रश्न केला असता रॉय यांनी प्रशांत किशोर यांच्यावर टीका केली. ते म्हणाले प्रशांत किशोर याआधी अखिलेश यादवांनाही भेटले आहेत. त्यांनी अखिलेश यांना उत्तर प्रेदेशातून संपवून टाकले आहेच. आता ते ममतांनाही बंगालमधून संपवण्याची तयारी करत आहेत.

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि भाजप यांच्यात जोरदार संघर्ष सुरू आहे. ममतांनी भाजपच्या केंद्रातील सरकारलाही थेट आव्हान केले आहे. येत्या १५ जूनला होणाऱ्या नीती आयोगाच्या बैठकीवरही त्यांनी बहिष्कार घातला आहे. शिवाय आयुष्यमान भारत योजना बंगालमध्ये लागू करण्यासाठी त्यांनी विरोध केला होता. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या किसान सन्मान योजनेच्या निधीसाठी केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांची यादी पाठवण्यास त्यांनी नकार दिला आहे.

कोण आहेत मुकुल रॉय? -

मुकुल रॉय हे एके काळी ममता यांच्या मर्जीतील नेते मानले जायचे. युपीए सरकारच्या काळात मुकुल रॉय हे रेल्वेमंत्री होते. ममता बॅनर्जी यांनी त्यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. तेव्हापासून ममता यांच्यासोबत त्यांचे संबंध बिघडले. मात्र, नंतर भाजपमध्ये प्रवेश करून ते सध्या ममतांचे कट्टर विरोधी म्हणून ओळखले जातात. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसमधील अनेक नेत्यांना भाजपकडे वळवण्यामागे त्यांची भूमिका महत्वाची मानली जाते.

कोण आहेत प्रशांत किशोर?

प्रशांत किशोर हे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी यांचे राजकीय सल्लागार होते. सध्या ते नितीशकुमार यांच्या जनता दल (यु) पक्षाचे उपाध्यक्ष आहेत. गेल्या लोकसभा आणि आंध्रप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचेही राजकीय सल्लागार म्हणून काम पाहिले आहे. त्याचबरोबर ते महाराष्ट्रात शिवसेनेचेही राजकीय सल्लागार आहेत.

भाजपने या लोकसभा निवडणुकीत बंगालमध्ये चांगलीच मुसंडी मारली आहे. त्यांनी तब्बल १८ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी येत्या विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी प्रशांत किशोर यांना पाचराण केले आहे. प्रशांत किशोर यांची जादू कितपत यशस्वी होते हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.