ETV Bharat / bharat

कर'नाटक'चा अंक दुसरा : येडियुरप्पा यांनी चौथ्यांदा घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची शपथ - कर्नाटक

बी. एस येडियुरप्पा कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. काँग्रेस-जेडी(एस) सरकार कोसळल्यानंतर भाजपकडून सत्ता स्थापनेला वेग आला होता.

बी. एस येदीयुरप्पा मुख्यमंत्री शपथ
author img

By

Published : Jul 26, 2019, 10:58 AM IST

Updated : Jul 26, 2019, 8:29 PM IST

बंगळुरु - बुकानाकेरे सिद्धलिंगप्पा येडियुरप्पा उर्फ बीएसवाय यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. बी. एस येडियुरप्पा कर्नाटकचे २३ वे मुख्यमंत्री झाले आहेत. तर, येडियुरप्पा चौथ्यावेळेस कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत.

येडियुरप्पा यांनी चौथ्यांदा घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची शपथ

UPDATES :

  • बी.एस येडियुरप्पांनी चौथ्यांदा घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, राज्यपाल वजुभाई वाला यांनी दिली शपथ. कर्नाटकचे २३ वे मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार.
  • येडियुरप्पा राजभवन येथे पोहचले.
    • Karnataka: BJP State President BS Yediyurappa reaches Raj Bhavan in Bengaluru. He will take oath as Chief Minister, today. pic.twitter.com/14PY5JBrZG

      — ANI (@ANI) July 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • शपथविधीसाठी येडियुरप्पा राजभवनकडे रवाना, थोड्यात वेळात शपथविधीला सुरुवात.
    • Karnataka: BJP State President BS Yediyurappa en-route Raj Bhavan in Bengaluru. He will take oath as Chief Minister, today. pic.twitter.com/2x968AR2Ct

  • येडियुरप्पांनी काडु मल्लेश्वरा मंदिरात केली प्रार्थना.
  • येडियुरप्पा कार्यकर्त्यांसह भाजप कार्यालयात पोहचले.
  • कर्नाटक भाजप अध्यक्ष बी. एस येडियुरप्पा भाजप कार्यालयात जाण्यासाठी निवासस्थानातून निघाले.

भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी ३१ जुलैची मुदत देण्यात आली आहे. सत्ता स्थापनेबाबतचे पत्र येडियुरप्पांनी राज्यपालांना दिले आहे. मी कर्नाटक भाजप पक्षाचा अध्यक्ष असून विरोधी पक्षनेता देखील आहे. भाजपकडे १०५ आमदारांचे संख्याबळ आहे. तसेच आमचा पक्ष विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष आहे.

बी. एस येडियुरप्पा सर्वात प्रथम २००७ मध्ये कर्नाटकच्या मुख्यंमत्री पदावर विराजमान झाले होते. मात्र, जेडीएसने पाठिंबा काढून घेतल्यामुळे ७ दिवसांत त्यांचे सरकार कोसळले होते. २००८ मध्ये येडियुरप्पा पुन्हा मुख्यमंत्री झाले होते. मात्र, जमीन गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे त्यांना राजीमाना द्यावा लागला होता. मे २००८ ते जुलै २०११ पर्यंत त्यांनी मुख्यमंत्री पद भूषवले होते.

येडियुरप्पा यांनी २०१२ साली 'कर्नाटका प्रजा पक्ष' स्थापन केला. पण, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी भाजपशी हातमिळवणी केली. कर्नाटक विधानसभा निवडणुकांत मुख्यंमत्री पद मिळवण्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न केले. मात्र, काँग्रेस-जेडी(एस)ने हातमिळवणी केल्याने मुख्यमंत्री होण्याचे त्यांचे स्वप्न भंगले होते.

दरम्यान, राज्यपालांना सकाळी १० वाजता भेटायला जाणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते. तसेच शपथविधी सोहळाही आजच घेण्यात यावा, अशी विनंती करणार असल्याचे ते म्हणाले होते. विधानसभा अध्यक्षांनी पत्रकार परिषद घेत पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत ३ बंडखोर आमदारांना अपात्र ठरवले आहे. त्यामुळे बहुमत सिद्ध करताना भाजपुढे अडचणी येतील का? हे येणारा काळच ठरवेल.

विश्वासदर्शक ठरावात भाजपच्या बाजूने १०५ मते पडली तर काँग्रेस पक्षाला ९९ मते मिळाली. त्यामुळे कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार कोसळले. काँग्रेस-जेडी(एस)चे सरकार बहुमत चाचणीत फेल झाल्यानंतर सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला होता. राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून राजकीय नाट्य सुरू आहे. भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर त्याला विराम मिळण्याची शक्यता आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jul 26, 2019, 8:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.