मोरिगाव - भाजपच्या आयटी सेलचा सदस्य असलेल्या नीतू बोराने फेसबुकवर जातीयविरोधी पोस्ट टाकली होती. गुरुवारी पोलिसांनी कारवाई करताना त्याला अटक केली आहे. शुक्रवारी त्याला नोटीस देवून सोडण्यात आले आहे.
मोरिगाव जिल्ह्यातील पोलीस आयुक्त स्वप्निल डेका यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले, की फेसबुकवर बोराने एका जातीविरोधात पोस्ट टाकली होती. याबद्दल त्याच्याविरोधात राजु महंता याने गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी बोराला अटक करण्यात आली होती. आम्ही त्याची चौकशी करुन त्याला नोटीस दिली आहे.
यावेळी पोलिसांनी बोराने आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याविरोधात पोस्ट टाकली नसल्याचे सांगितले. पोलीस म्हणाले, याबाबत तपास सुरू आहे. बोराने आसामच्या मुख्यमंत्र्यांविरोधात काही लिहिले नाही. परंतु, त्याने फेसबुकवर जातीयवादी पोस्ट टाकली आहे.