नवी दिल्ली - महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने आज (२ ऑक्टोबर) आज देशभरामध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस पक्षाने देशभरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. १५० व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी श्रद्धांजली वाहिली.
काँग्रेसने देशभरामध्ये पदयात्रांचे आयोजन केले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी दिल्लीमध्ये एका पदयात्रेचे नेतृत्त्व करणार आहेत. त्याबरोबरच काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी लखनऊमध्ये पदयात्रेचे नेतृत्त्व करणार आहेत.
हागणदारी मुक्त भारतची घोषणा
गांधी जयंतीनिमित्त पंतप्रधान गुजरातमधील साबरमती आश्रमाला भेट देणार आहेत. गांधीजींच्या स्मरनार्थ २०१४ साली देशभरामध्ये स्वच्छ भारत अभियान सुरू करण्यात आले होते. स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधान भाग घेणार आहेत. त्यावेळी पंतप्रधान देश हागणदारी मुक्त झाल्याची घोषणा करणार आहे.
भाजप अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शाह दिल्लीमधील शालीमार बागेत आयोजित एका सभेला संबोधित करणार आहेत. त्यानंतर शाहा गांधी संकल्प यात्रेसाठी रामलीला मैदानावर जाणार आहेत. तसेच भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी नड्डा हेही गांधी संकल्प यात्रेत सहभागी होणार आहे.