मुझफ्फरपूर - बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यात अॅक्युट इन्सेफॅलिटिस सिंड्रोमने तब्बल ६९ मुलांचा मृत्यू झाला आहे. सिव्हिल सर्जन डॉ. शैलेश प्रसाद सिंह यांनी ही माहिती दिली.
श्री कृष्ण वैद्यकीय महाविद्यालयात यापैकी ५८ मुलांचा मृत्यू झाला. तर, खासगी केजरीवाल रुग्णालयात ११ जण मरण पावले. सध्या या आजाराने पीडित आणखी १३० मुले रुग्णालयात दाखल आहेत. या कारणामुळे आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळा २२ जूनपर्यंत बंद ठेवण्यात आल्या असल्याची माहिती मुझफ्फरपूरच्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटनी दिली आहे. तर, त्यावरील विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्या शाळा केवळ १०.३० पर्यंत चालू राहतील.
अॅक्युट इन्सेफॅलिटिस सिंड्रोम हा विषाणूजन्य आजार आहे. यामध्ये फ्ल्यूसारखी लक्षणे दिसतात. यात ताप, आकडी, बेशुद्धी, डोकेदुखी यांचा समावेश आहे. मागीक काही आठवड्यांपासून या आजाराने बिहारमध्ये थैमान घातले आहे. यात अनेक बळी गेले आहेत.