पाटणा - बिहारच्या अररिया जिल्ह्यात मॉब लिंचिंगची घटना घडली आहे. एका महिलेला नऊ महिन्यांच्या बालकाचे अपहरण केल्याच्या संशयावरून बेदम मारहाण करण्यात आली, त्यानंतर तिला जिवंत जाळण्यात आले. जिल्ह्याच्या बेलगच्ची गावाजवळ ही घटना घडली. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्यानंतर ही घटना प्रकाशात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारपासून बेपत्ता असलेल्या नऊ महिन्यांच्या बालकाचा मृतदेह, स्थानिकांना शेतात मिळाला होता. गावात या महिलेला लोकांनी पहिल्यांदाच पाहिले असल्याने, या अपहरण आणि हत्येत तिचाच हात असल्याचा संशय गावकऱ्यांना आला. याच संशयातून गावातल्या लोकांनी तिला बेदम मारहाण केली, आणि नंतर जिवंत जाळून टाकले.
दरम्यान, राणीगंगचे उपविभागीय पोलीस अधिकारी के. डी. सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेचे मृत बालकाच्या वडिलांशी अवैध संबंध होते. त्यांना भेटायला म्हणून ती महिला गावात आली होती. या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सोबतच, तीन लोकांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरु आहे.
हेही वाचा : उन्नाव बलात्कार प्रकरण: पीडितेच्या अपघातप्रकरणी कुलदीप सेनगरवर हत्येचा आरोप नाही