पाटणा - मागील अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या बिहारच्या महाआघाडीची जागा वाटप अखेर जाहीर झाली आहे. महाआघाडीतील सर्व पक्षांच्या वरिष्ठांनी एकत्र येऊन वाटून घेतलेल्या ४० जागा जाहीर केल्या आहेत. त्यामध्येही लोकतांत्रीक जनता दलाचे (एलजेपी) नेते शरद यादव राष्ट्रीय जनता दल (आरजेडी)च्या निवडणुक चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत.
मागील अनेक दिवसांपासून बिहारच्या महाआघाडीच्या जागा वाटपावर देशाचे लक्ष होते. जागा वाटप होण्यामध्ये विलंब होत असल्यामुळे येथेही महाआघाडी होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र, आज शेवटी यादी जाहीर झाली. यामध्ये राजेडीला २० जागा, काँग्रेसला ९ जागा, राष्ट्रीय लोक समता पक्षाला ५ आणि जितन राम मांझी यांचा पक्ष हिंदूस्तान अवाम मोर्चाला ३ तर विकासशील इंसान पक्षाला ३ तर माले येथे आरजेडीच्या कोट्यातून १ जागा निश्चित करण्यात आली आहे.
बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण ४० जागा आहेत. सध्या तेथे एनडीचे सरकार असून नितीश कुमार मुख्यमंत्री आहेत. पत्रकार परिषदेमध्ये आरजेडीचे तेजस्वी यादव हजर नसल्यामुळे थोडक्यात खळबळ उडाली होती. मात्र, त्यानंतर आरजेडी नेते विनोद कुमार झा यांनी पत्रकारांना फटकारत आपल्यालाही पक्षात काही अधिकार असल्याचे सांगितले.