ETV Bharat / bharat

बिहारमध्ये पूरपरिस्थिती बिकट, मृतांची संख्या पोहोचली २५ वर

राज्य आपत्ती व्यवस्थापनाने जारी केलेल्या बुलेटीननुसार दरभंगा जिल्ह्यात २० लाख लोक पुरामुळे बाधित झाले आहेत. मुझफ्फरपूरमध्ये सहा, पश्चिम चंपारणमध्ये चार आणि सारण व सिवानमध्ये प्रत्येकी दोन मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील सीतामढी, श्योहर, सुपौल, किशनगंज, गोपाळगंज, पूर्व चंपारण, खगेरिया, समस्तीपूर, मधुबनी, मधेपुरा आणि सहरसा या भागात पूरपरिस्थिती गंभीर आहे.

बिहार पूर
बिहार पूर
author img

By

Published : Aug 14, 2020, 10:34 AM IST

पटना (बिहार) - राज्यात आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून १६ जिल्ह्यांना या पुराचा मोठा फटका बसला आहे. बिहारमधील पुरामुळे गुरुवारपर्यंत २५ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. नेपाळमध्ये उगम पावणाऱ्या नद्यांची पाणी पातळी वाढली आहे.

बिहार पूर

राज्य आपत्ती व्यवस्थापनाने जारी केलेल्या बुलेटीननुसार दरभंगा जिल्ह्यात २० लाख लोक पुरामुळे बाधित झाले आहेत. मुझफ्फरपूरमध्ये सहा, पश्चिम चंपारणमध्ये चार आणि सारण व सिवानमध्ये प्रत्येकी दोन मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील सीतामढी, श्योहर, सुपौल, किशनगंज, गोपाळगंज, पूर्व चंपारण, खगेरिया, समस्तीपूर, मधुबनी, मधेपुरा आणि सहरसा या भागात पूरपरिस्थिती गंभीर आहे.

राज्यात १९ एनडीआरएफ पथकांसह बचाव कार्य सुरू आहे. पटना शहरामध्ये सगळीकडे पाणी तुंबले. राज्यामध्ये १९ राष्ट्रीय आपत्ती निवारण पथके मदत कार्यात व्यग्र आहेत. त्यातील ५ पथके एकट्या पटना शहरात आहेत. अनेक लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले येत आहे.

हेही वाचा - राजकीय संघर्षानंतर पायलट-गेहलोत एकत्र मंचावर, हस्तांदोलन अन् गळाभेटीनंतर वादाचा शेवट?

एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांकडून बचाव कार्य सुरू असून 12,500 स्थलांतरित लोकांना विविध ठिकाणी मदत केंद्रांवर ठेवण्यात आले आहे. याव्यतिरिक्त एक हजाराहून अधिक सामूहिक स्वयंपाकघरांमधून आठ लाखाहून अधिक लोकांना जेवण दिले जात आहे. एनडीआरएफ-9 बटालियनचे कमांडर विजय सिन्हा म्हणाले की, 14 जिल्ह्यांमध्ये एकूण 23 पथके तैनात करण्यात आली आहेत.

हेही वाचा - भारत-चीन तणाव : लडाखमध्ये दोन लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर तैनात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.