ETV Bharat / bharat

बिहार विधानसभा : 'शेतकऱ्यांची जमीन हडपणारे आता त्यांची चिंता करतायेत'

बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी महागठबंधनच्या निवडणूक जाहीरनाम्यावर टीका केली आहे. जीवनभर ज्या पक्षांनी जमीन हडपल्या ते आज शेतकऱ्यांची चिंता करत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

author img

By

Published : Oct 17, 2020, 5:23 PM IST

sushil kumar modi
सुशील कुमार मोदी

पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीसाठी महागठबंधनने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या वेळी, आरजेडी नेते तेजस्वीनी यादव यांच्यासह काँग्रेस नेते रणदीपसिंग सुरजेवाला आणि शक्तीसिंह गोहिल व अन्य नेते उपस्थित होते. महागठबंधच्या जाहीरनाम्यावर बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी सडकून टीका केली आहे. 'जीवनभर ज्या पक्षांनी जमीनी हडपल्या ते आज शेतकऱ्यांची चिंता करत आहेत', असे ते म्हणाले.

'जे लोक पैसे घेवून नोकऱ्या देत आले, ते आज नोकऱ्या देण्याची गोष्ट करतायेत. जीवनभर ज्या पक्षांनी शेतकऱ्यांच्या जमीनी हडपल्या ते आज शेतकऱ्यांची चिंता करतायेत. ते(महागठबंधन) फक्त घोषणा देऊ शकतात. जनतेला काही देऊ शकत नाही', असे बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी म्हणाले.

उपमुख्यमंत्री सुशिल कुमार मोदी

गुन्हेगारांना तिकीट देणारे कायदा सुव्यवस्थेच्या बाता मारतायेत

जे लोक गुन्हेगार आणि क्रुरपणा करणाऱ्यांना निवडणुकीचे तिकीट देत आले, ते आज बिहारमध्ये कायदा सुव्यवस्थेची गोष्ट करतायेत. ज्या पक्षाने कायम शेतकऱ्यांच्या जमीनी हडपल्या त्यांना आता शेतकऱ्यांची चिंता का भासायला लागली, असे सुशील कुमार मोदी म्हणाले.

प्रण हमारा संकल्प बदलाव का - महागठबंधना जाहीरनामा

तेजस्वी यांनी स्वत: शुद्ध बिहारी असल्याचा दावा करून आणि सत्तेवर येताच 10 लाख रोजगार देण्याचे आश्वासन दिले. 'आम्ही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी वचन दिले आहे. आमचा जाहीरनामा आहे - 'प्रण हमारा संकल्प बदलाव का' मी शुद्ध बिहारी आहे. माझा डीएनए शुद्ध आहेत. आम्ही सत्तेत आल्यास पहिल्या मंत्रिमंडळात आम्ही १० लाख तरुणांना नोकरी देऊ, अशी घोषणा मी करतो. सरकारी नोकऱ्यांचे निवेदन अर्ज नि:शुल्क असतील. परीक्षा केंद्रावर जाणाऱ्या उमेदवारांचा प्रवास खर्च सरकार उचलेल. गरजू लोकांना मदत करण्यासाठी 'करुपुरी श्रम वीर सहाय्य केंद्र' राज्यभरात सुरू केले जाईल. आम्ही शिक्षकांनाही आम्ही मदत करू,' असे ते म्हणाले.

'या निवडणुकीतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे बेरोजगारी. सध्याच्या सरकारवर लोक संतप्त आहेत. अनेकांचे नोकरी-व्यवसाय नष्ट झाले आहेत. सरकार त्याकडे लक्ष देत नाही. केंद्र सरकारने नुकसान भरपाईचा अंदाज घेण्यासाठी 18 पूरग्रस्त जिल्ह्यांचा दौरा केला नाही. ते सत्तेसाठी भुकेले आहेत,' असे तेजस्वी यादव जाहीरनामाच्या प्रकाशनावेळी म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.