ETV Bharat / bharat

बिहार निवडणूक: महागठबंधनचा जागा वाटप फॉर्म्युला ठरवण्यासाठी दिल्लीत खल - महागठबंधन जागा वाटप

२०१५ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने २७ जागा जिंकल्या होत्या. तर ८० जागा मिळवून आरजेडी सर्वात मोठा पक्ष ठरला होता. आता काँग्रेस आणि आरजेडीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू आहे.

FILE PIC
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Sep 30, 2020, 8:35 PM IST

नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि महागठबंधनमध्ये चुरशीची लढत पहायला मिळणार आहे. दरम्यान, राष्ट्रीय जनता दलासोबत (आरजेडी) जागा वाटपाचा निर्णय घेण्यासाठी बिहार काँग्रेसचे प्रमुख मदन मोहन झा दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत. आरजेडी आणि काँग्रेस मिळून एनडीएच्या विरोधात लढणार आहेत.

हेही वाचा - हाथरस सामूहिक बलात्कार : योगी आदित्यनाथ यांच्या राजीमान्याची काँग्रेसकडून मागणी

तर जनता दल यूनायटेड आणि भाजप एनडीए आघाडीतील महत्त्वाचे पक्ष आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार जनता दल यूनायटेड पक्षाचे तर लालू प्रसाद यादव आरजेडी पक्षाचे नेतृत्व करत आहेत. 'ज्या ठिकाणी काँग्रेसच्या जागा निवडूण येण्याची जास्त शक्यता आहे, त्याची माहिती वरिष्ठ नेत्यांनी मागितली आहे. काँग्रेसची स्थायी समिती बुधवारी या जागांचा आढावा घेईल. त्यानंतर उद्या सायंकाळी किंवा सकाळी आरजेडीला जागासंबंधी सांगण्यात येईल, असे झा म्हणाले. जागा वाटपासंबंधी लवकर निर्णय घेण्यासाठी आरजेडीकडून काँग्रेसवर दबाव आणला जात होता. त्यामुळे काँग्रेसच्या निर्णय प्रक्रियेला वेग आला आहे. त्यामुळे आज झा दिल्लीत तत्काळ पोहचले.

हेही वाचा - 'हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरण निंदनीय आणि अन्यायकारक'

२०१५ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने २७ जागा जिंकल्या होत्या. तर ८० जागा मिळवून आरजेडी सर्वात मोठा पक्ष ठरला होता. आरजेडी पक्षाची एक टीम जागा वाटपासाठी राहुल गांधी यांच्याशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला जाईल, असे पक्षातील सुत्रांनी सांगितले. काँग्रेसला ५५ ते ५८ जागा देण्याचा विचार करत असल्याचेही सुत्रांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.