छप्रा - बिहारमधील एका वधूने दारूच्या नशेत तर्र होऊन लग्न-मंडपात आलेल्या वराशी विवाह करण्यास नकार दिला. तसेच, विवाह रद्द झाल्याचे सांगत ती लग्न-मंडपातून सरळ निघून गेली. रिंकी कुमारी असे वधूचे तर बबलू कुमार असे दारूड्या वराचे नाव आहे.
मुलीचे वडील त्रिभुवन शाह यांनी घडल्या प्रकाराची माहिती दिली. 'मुलीचा होणारा नवरा दारूच्या नशेत धुंद होऊन मांडवात आला. त्याला परिस्थितीचे आणि स्वतःच्या लग्नाचेही भान नव्हते. तो नीट उभाही राहू शकत नव्हता. लग्नविधींमध्ये त्याचे मुळीच लक्ष नव्हते. तसेच, त्याने मांडवात आल्यानंतर गैरवर्तन आणि वादावादीही केली. हे पाहिल्यानंतर माझ्या मुलीने अट्टल दारूड्या वराशी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. तसेच, ती विवाहस्थळ सोडून निघून गेली. तिला दोन्हीकडच्या नातेवाईकांनी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती तिच्या निर्णयावर ठाम राहिली,' असे शाह म्हणाले.
या प्रकारानंतर उपस्थितांनी आणि गावकऱ्यांनीही वधूच्या निर्णयाला पाठिंबा दिला. तसेच, वराला लग्नाआधी घेतलेल्या सर्व वस्तू, हुंडा परत मिळेपर्यंत विवाहस्थळावरच रोखण्यात आले होते. गावकऱ्यांनी स्वतः पुढे होऊन सर्व वस्तू आणि हुंडा परत मिळाल्याखेरीज वराला तेथून जाऊ दिले नाही.
Conclusion: