पाटना - बिहारमधील भाजपचे आमदार सुनिल कुमार सिंह (66) यांचे काल (मंगळवार) एम्स रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झाला. सिंह मधूमेह आणि तणावाचा सामना करत होते. त्यातच कोरोनाची लागण झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. कोरोनामुळे राज्यात पहिल्यांदाच एखाद्या आमदाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
सुनिल सिंह यांच्यामागे दोन पत्नी आणि तीन मुले आहेत. दरभंगा मतदार संघातून ते विधान परिषदेवर निवडून गेले होते. 13 जुलैला सिंह यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. एम्स रुग्णालयाचे नोडल अधिकारी संजीव कुमार यांनी याबाबत माहिती दिली.
मुख्यमंत्री नितिश कुमार, उपमुख्यमंत्री सुशिल कुमार मोदी, बिहार विधीमंडळाचे चेअरमन अवधेश नारायन सिंह या नेत्यांनी दु:ख व्यक्त केले.
‘विधान परिषद सदस्य सिंह लोकप्रिय होते. त्यांना सामाजिक कार्यात रस होता. त्यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्राचे आणि समाजाचे नुकसान झाल्याचे मुख्यमंत्री नितिश कुमार म्हणाले’. सिंह यांचा मुलगा सुजीत याच्याशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. बिहार राज्यातील सहा आमदारांना आत्तापर्यंत कोरोना झाला आहे. विधीमंडळाच्या हंगामी अध्यक्षांनाही कोरोना झाली लागण झाली होती.